Dhule News : शिरपूरमध्ये कॅफेवर छापा, एकावर गुन्हा

crime
crimeesakal
Updated on

शिरपूर (जि. धुळे) : शहरातील कॅफेवर छापा टाकून शहर पोलिसांनी अश्लील चाळे करणाऱ्या तीन जोडप्यांना ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले. एका कॅफेचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (City police raided cafe in city arrested couple dhule news)

शहरातील कॅफेमध्ये युवक-युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी काही कॅफेचालक जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस.आगरकर यांना माहिती मिळाली होती. शुक्रवारी (ता.१०) त्यांनी दिवसभरात शहरात विविध कॅफेची पाहणी केली.

त्यात करवंद रस्त्यावरील एका कॅफेमध्ये तीन जोडपी अश्लील चाळे करताना आढळली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. काही वेळाने त्यांच्या पालकांना बोलावून संबंधितांना ताब्यात देण्यात आले. कॅफेमालक अरविंद राजपूत याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक किरण बान्हे, संदीप मुरकूटे, गणेश कुटे, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, चेतन सोनवणे, भुपेश गांगुर्डे, सनी सरदार, उमाकांत वाघ, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, महिला पोलिस पौर्णिमा पाटील, प्रतिभा देशमुख, पुजा सारसर, अनिता पावरा आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime
Dhule News : धुळ्यात महत्त्वाचा रस्ता महिनाभर वाहतुकीस बंद

शिरपूर शहरात अशाप्रकारे गैरकृत्य करणारे कॅफे कायमस्वरुपी बंद करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर उपाययोजना सुरु असून गैरकृत्य करणारे कॅफेवर लक्ष केंद्रीत करुन तेथे गैरकृत्य आढळल्यास कॅफे चालक व मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत आहोत.

कोणत्याही कॅफेमध्ये गैरकृत्य सुरु असल्याचे आपले निदर्शनास आल्यास त्याबाबत आम्हास निःसंकोचपणे माहिती द्यावी आपले नांव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

crime
Board Exam : यंदा दहावी, बारावीची परिक्षा कडक; कॉपीमुक्त अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.