Dhule News : परवानगी नसताना शहरभर उभारले खांब

A Shiv Sena office bearer while giving a statement to Resident Deputy Collector Sanjay Gaikwad demanding that the pillar erected by Reliance Jio Company in Dhule city should be investigated and responsibility should be fixed on the concerned
A Shiv Sena office bearer while giving a statement to Resident Deputy Collector Sanjay Gaikwad demanding that the pillar erected by Reliance Jio Company in Dhule city should be investigated and responsibility should be fixed on the concernedesakal
Updated on

धुळे : महापालिकेची कुठलीही परवानगी, कार्यादेश तथा करारनामा नसताना काही अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने नियम धाब्यावर बसवून धुळे शहरात रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीने खांब उभारले.

यासाठी शहरातील नवीन रस्ते फोडले गेले, जलवाहिन्या तोडल्या, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या कामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, या प्रकरणी विभागीय आयुक्तांसह मुख्य सचिवांकडेही तक्रार केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. (Citywide without permission pillar erected by Reliance Jio Infocomm Shiv Sena party demanded a thorough investigation to collector of municipal corporation Dhule News)

A Shiv Sena office bearer while giving a statement to Resident Deputy Collector Sanjay Gaikwad demanding that the pillar erected by Reliance Jio Company in Dhule city should be investigated and responsibility should be fixed on the concerned
Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

धुळे महापालिका क्षेत्रात रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि., पुणे या कंपनीतर्फे इंटरनेट जोडणीसाठी किमान आठ ते दहा हजार खांब उभारण्यात आले. हे काम करताना नुकतेच काँक्रिटीकरण, डांबरीकरण केलेले रस्ते एक बाय एक मीटर खोदून महापालिकेचे आर्थिक नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, विद्रूपीकरण केले आहे.

या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची, नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रस्ते खोदताना जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

A Shiv Sena office bearer while giving a statement to Resident Deputy Collector Sanjay Gaikwad demanding that the pillar erected by Reliance Jio Company in Dhule city should be investigated and responsibility should be fixed on the concerned
Nagpur News: नागपूरकरांची संपन्नता वाढली!

पैसे उकळण्यासाठी नोटीस

महापालिकेने २१ जुलै २०२२ ला संबंधित कंपनीस नोटीस बजावताना खांब उभारणीच्या कामाला परवानगी नसल्याचे स्वतःच कबूल करून उभारलेले खांब काढून टाकावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत नमूद केले आहे. मात्र, आज सहा महिने होऊनही मनपाने कुठलीही कारवाई केलेली नाही. किंबहुना ही नोटीसच ठेकेदाराकडून जास्तीचे पैसे उकळण्यासाठी दिली गेल्याचा आरोप शिवसेनेने केला.

A Shiv Sena office bearer while giving a statement to Resident Deputy Collector Sanjay Gaikwad demanding that the pillar erected by Reliance Jio Company in Dhule city should be investigated and responsibility should be fixed on the concerned
Solapur Crime News: जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल

जबाबदारी निश्‍चित करा

कंपनीतर्फे किमान आठ-दहा हजार खांब उभे राहिले आहेत. मात्र, कंपनी ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने खोटी आकडेवारी सादर करून केवळ १५५ खांबांसाठी ६५० खड्डे खोदण्याची परवानगी मागितली. त्यानुसार एक हजार ६४० रुपये प्रतिखांब दर आकारून एकूण १० लाख ६६ हजार रुपये आयुक्तांच्या नावाने जमा करण्याची टिपणी १४ ऑक्टोबर २०२१ ला मंजूर करण्यात आली.

मात्र पुन्हा ठेकेदाराशी अर्थपूर्ण हातमिळवणी करून केवळ १३ हजार ६८९ रुपयांचा भरणा करून प्रकरण रफादफा केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करावी, झालेले नुकसान त्यांच्या पगारातून वसूल कराव, अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिले.

A Shiv Sena office bearer while giving a statement to Resident Deputy Collector Sanjay Gaikwad demanding that the pillar erected by Reliance Jio Company in Dhule city should be investigated and responsibility should be fixed on the concerned
Municipal Corporation News : दरमहा सहा लाख खर्च, शौचालय साफसफाईची बोंबाबोब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.