Dhule Civil Hospital : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) डॉक्टर वर्ग कंटाळवाणा दिसतो. यात रुग्णाला अॅडमिट करण्यात टाळाटाळ केली जाते. रुग्णाला हिरे मेडिकलच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यावर भर असतो.
अनेक विभागांत सर्जिकल साहित्य, ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर उपलब्ध होत नाही. रुग्णाला दुपारचे जेवणही दुर्मीळ झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांना बुधवारी (ता. २६) घेराव घातला. (civil hospital reluctant to admit patient dhule news )
शिवसेनेचे शिष्टमंडळ संयुक्त चर्चेत म्हणाले, की सिव्हिलमध्ये हातात सलाइन घेत रुग्ण वॉर्डात दाखल होतो. रुग्णालयात कार्यरत जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, डेंटल आदी विभागात रुग्णांची योग्य तपासणी केली जात नाही.
त्यांना वेळेत रुग्णालयात अॅडमिट करण्यासंदर्भात टाळाटाळ केली जाते. या सर्वच विभागांतील डॉक्टर वेळेवर रुग्णांची तपासणी करण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना तासन् तास ताटकळत बसावे लागते.
डॉक्टरांची टाळाटाळ
रुग्णालय सुरू झाल्यापासून केवळ सिव्हिल सर्जन व डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे. या रुग्णालयात कायमस्वरूपी ‘आरएमओं’ची नेमणूक नसल्याने अनेक पिवळे कार्डधारक रुग्णांना केसपेपर व इतर उपचार, सुविधांपासून वंचित राहावे लागते.
तसेच ६० खाटांचे नवीन अद्यावत बेड रुग्णालयात तयार असून, अनेक महिने उलटून गेल्यावरही ते कार्यान्वित करण्यासाठी डॉक्टर सहकार्य करत नाही. त्याकडे सिव्हिल सर्जनही दुर्लक्ष करतात. अपघातातील नागरिकाला सिव्हिलऐवजी हिरे मेडिकलच्या रुग्णालयात कसे पाठविता येईल, यावर सिव्हिलच्या डॉक्टरांचा भर असतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रसंगी एका दिवसासाठी उपचार करून रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. स्त्रीरोग विभागात रात्रीच्या वेळी तातडीने दाखल होणाऱ्या महिलांना अॅडमिट केले जात नाही. सिझर करण्यासाठी सर्वच डॉक्टर टाळाटाळ करतात. जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मंजूर होत असताना अनेक विभागांत सर्जिकल साहित्य, ऑक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य, स्ट्रेचर उपलब्ध नाहीत.
कामगारांची उदासीनता
कंत्राटी कामगार योग्य प्रकारे काम करत नाहीत, अरेरावी करतात आदी समस्यांची जंत्री शिवसेनेने मांडली. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, नरेंद्र परदेशी, भरत मोरे, देवीदास लोणारी, ललित माळी, गुलाब माळी, संजय जवराज, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, आनंद जावडेकर, प्रवीण साळवे, छोटू माळी, भटू गवळी, सुनील चौधरी, संजय जगताप, सागर निकम, शुभम मतकर, अनिल शिरसाट, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.
आठवड्यात सुधारणा करू ः डॉ. वानेरे
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तक्रार मांडल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे यांनी आठवड्यात सर्व समस्यांवर उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले. सिव्हिल हॉस्पिटल दोन वर्षांपूर्वी ३१ ऑगस्टला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले. अद्यापही विविध समस्यांवर तोडगा काढला जात नसल्याने शिवसेनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. व्यवस्थापनाने महिनाभरात तोडगा काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.