Dhule Crime News : शहरातील साक्री रोडवरील मिलिन्द हाउसिंग सोसायटी येथे घराचे बांधकाम करताना पायर्याया रोडवर बांधू नये, यावरून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाली. हाणामारीत लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर झाला.
शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (Clash between 2 groups over construction of stairs Crime against 19 persons Dhule Crime News)
आबा शंकर अहिरे (रा. मिलिन्द हाऊसिंग सोसायटी, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार, विक्की रमेश लोंढे याने त्याच्या घराचे बांधकाम करताना पायऱ्या रस्त्यावर बांधू नये, असे आबा अहिरे यांची बहीण निर्मला नागमल व मेहुणे हिंमत नागमल यांनी सांगितले.
त्यावरून शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घराजवळ विक्की लोंढे याच्यासह रमेश पुंडलिक लोंढे, लक्ष्मीबाई रमेश लोंढे, अशोक पुंडलिक लोंढे, रिना कुणाल बिऱ्हाडे, शीला अशोक लोंढे,
शोभा रवींद्र लोंढे, अनुराधा राहुल लोंढे, राहुल रमेश लोंढे (सर्व रा. मिलिंद सोसायटी धुळे) यांनी जणांनी काठ्या घेऊन एकत्रित गर्दी केली व आबा अहिरे यांच्यासह घरातील मंडळींना शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच विक्की लोंढे याने लोखंडी रॉडने आबा अहिरे यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच स्वप्निल बाळू पगारे, आदेश अहिरे, हिंमत नागमल, अनुष्का बैसाणे, श्रुती आबा अहिरे यांनाही मारहाण करून जखमी केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आबा अहिरे यांची पत्नी मनीषा अहिरे यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत तोडून नुकसान केले. यावरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच परस्परविरोधात शोभा प्रवीण लोंढे (रा. मिलिन्द सोसायटी, साक्री रोड धुळे) यांच्या फिर्यादीनुसार सोनू ऊर्फ रोहित आबा अहिरे याच्यासह इतरांनी घराचे बांधकाम करताना पायऱ्या या रोडवर बांधू नये, या कारणावरून वाद घातला. या वादात सोनू अहिरे यांच्यासह आबा शंकर अहिरे, विकी युवराज अहिरे, डॉली आबा अहिरे, मनीष आबा अहिरे, आकांक्षा अनिल अहिरे, वंदना योगेश मोरे, सरला बैसाणे, योगेश वाल्हा मोरे (रा. मिलिन्द सोसायटी, धुळे) यांनी एकत्रित गर्दी करून शोभा लोंढे यांच्यासह पुतणी रिना कुणाल बिऱ्हाडे, पुतण्या विक्की लोंढे यांना लोखंडी रॉड, काठी व हाताबुक्याने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेले रमेश पुंडलिक लोंढे, लक्ष्मीबाई रमेश लोंढे, अशोक पुंडलिक लोंढे, शीला अशोक लोंढे, अनुराधा लोंढे, राहुल रमेश लोंढे यांनादेखील शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.