Clean Survey 2023 : वैयक्तिक शौचालयांसाठी अकराशे अर्ज प्राप्त; महापालिकेच्या आवाहनानंतर प्रतिसाद

clean survey
clean survey esakal
Updated on

Clean Survey 2023 : स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत महापालिकेतर्फे वैयक्तिक शौचालयांच्या लाभासाठी नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत असून, महापालिकेकडे आतापर्यंत अकराशे अर्ज प्राप्त झाले आहेत.

ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा कुटुंबांनी वैयक्तिक शौचालयासाठी महापालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन महापौर, आयुक्तांनी केले आहे. (clean survey 2023 11 hundred applications received for individual toilets dhule news)

दरम्यान, सध्या वापरात नसलेली, जीर्ण झालेली शहरातील १४ सार्वजनिक शौचालये १ ऑगस्ट २०२३ पासून बंद करण्यात येणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय असणे आवश्‍यक आहे. धुळे महापालिका हद्दीतील ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबाचा शोध घेण्याची मोहीम धुळे महापालिकेमार्फत सुरू आहे. अशा कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासनामार्फत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनातर्फे १२ हजार रुपये व धुळे महापालिकेतर्फे चार हजार रुपये असे एकूण १६ हजार रुपये अनुदान टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. यासाठी लागणारा आवश्यक तो निधी शासनामार्फत प्राप्त होणार आहे.

त्यामुळे ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही त्यांनी कुटुंबप्रमुखाचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, दोन पासपोर्ट साइजची छायाचित्रे व शौचालय बांधकामासाठी जागा उपलब्ध असलेले छायाचित्र, मालमत्ता कर भरल्याची पावती, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तसेच विहित नमुन्यातील अर्ज सादर करावयाचा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

clean survey
Clean Survey 2023 : कचराकुंडी मुक्तीतून ‘स्वच्छ धुळे’साठी प्रयत्न! कारवाईचाही इशारा

यासाठी धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी अर्ज जमा करायचे आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त देवीदास टेकाळे, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, सभागृहनेत्या भारती माळी, अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, उपायुक्‍त डॉ. संगीता नांदूरकर यांनी केले आहे.

आवाहनाला प्रतिसाद

वैयक्तिक शौचालयांच्या अनुदान लाभासाठी महापालिकेने अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर आतापर्यंत स्वतंत्र कक्षाकडे एक हजार १०० अर्ज प्राप्त झाले आहेत. यानंतर आणखी प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीसाठी हद्दवाढ क्षेत्रातही जनजागृतीची गरज व्यक्त होते.

‘सार्वजनिक’ कमी होणार

धुळे शहरातील विविध भागात १४३ सार्वजनिक शौचालय युनिट आहेत. शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीसह स्वच्छतेबाबत मात्र मोठ्या प्रमाणावर तक्रारी असतात. या पार्श्वभूमीवर तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी करण्याचेही उद्दिष्ट आहे. त्यामुळे वापरात नसलेली व जीर्ण झालेली शहरातील १४ शौचालये महापालिकेकडून १ ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहेत. ही शौचालये पाडण्यात येतील.

clean survey
Clean Survey Scheme : स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर सज्ज; सार्वजनिक भिंतींचे सुशोभीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()