Cleanliness Drive : एकाच दिवशी 38 आरोग्य संस्थांत स्वच्छता मोहीम

आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार
health centre
health centreesakal
Updated on

तळोदा (जि. नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, २७ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे व सहा प्राथमिक आरोग्यप्रथके अशा एकूण ३८ आरोग्य संस्थांत एकाच दिवशी सर्वांगीण स्वच्छता मोहीम (Cleanliness Drive) राबविण्यात आली. (Cleanliness drive in 38 health institutions on same day nandurbar news)

या वेळी केंद्रातील परिसरात स्वच्छता करीत आंतररुग्ण विभाग, स्वच्छतागृह, भांडार विभाग तसेच इतर विभागात स्वच्छता करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्याच्या चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशान्वये आणि तळोद्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण व गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. ४) तळोदा तालुक्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या वेळी बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पावरा यांच्या, प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश पावरा यांच्या, तर सोमावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर ठाकरे यांच्या व वाल्हेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सायसिंग पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

health centre
Impact of Budget 2023 : Sports Scienceसाठी अवघ्या 13 कोटी तरतुदीमुळे नाराजी

या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रातील परिसर स्वच्छ करण्यात आला. केंद्रातील आंतररुग्ण विभाग, स्वच्छतागृह, भांडार विभागात स्वच्छता करण्यात आली. कॉरिडॉर, शस्त्रक्रियागृह निर्जंतुकीकरण करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील प्रसूतिगृह, बाह्यरुग्ण विभाग, स्त्री-पुरुष विभाग, माहेरघर आदी ठिकाणी स्वच्छता करून आरोग्यविषयक संदेश असलेले फलक लावण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्याकडील प्राप्त आदेशानुसार महिन्याचा पहिला शनिवार ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य केंद्र व उपकेंद्रात चांगल्या दर्जाच्या आरोग्याचा सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे लोकसहभाग वाढून गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा गरजू लोकांपर्यंत पोचणार आहे.

"दरमहिन्याला शनिवारी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा संपूर्ण सहभाग घेऊन त्या दिवशी स्वच्छता, निर्जंतुकीकरण व कार्यालयातील कागदपत्र-दप्तर यांची विगतवारी व निर्लेखीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेत एनएसएस, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे." -डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्याधिकारी, तळोदा

health centre
Nashik Crime News : बोलेरो कारसह 2 दुचाकींची चोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.