Nandurbar News : जिल्ह्यात प्रथमच कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

जन्मजात कर्णबधिर असणाऱ्या (दिव्यांग) रुग्णांसाठी वरदान ठरलेली कॉक्लियर इम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया येथील भगवती कान-नाक-घसा हॉस्पिटल व एन्डोस्कोपी सेंटर येथे प्रजासत्ताक दिनी यशस्वीरीत्या पार पडली.
Dr. Rajesh Koli, Tejaswini Koli.
Dr. Rajesh Koli, Tejaswini Koli.esakal
Updated on

Nandurbar News : जन्मजात कर्णबधिर असणाऱ्या (दिव्यांग) रुग्णांसाठी वरदान ठरलेली कॉक्लियर इम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया येथील भगवती कान-नाक-घसा हॉस्पिटल व एन्डोस्कोपी सेंटर येथे प्रजासत्ताक दिनी यशस्वीरीत्या पार पडली.

नामवंत कॉक्लियर इम्प्लांट सर्जन व मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलच्या कान-नाक-घसा विभागाप्रमुख डॉ. हेतल मारफातिया (पटेल), भगवती हॉस्पिटलचे डॉ. राजेश कोळी, डॉ. तेजस्विनी कोळी, डॉ. अस्मिता मढवी यांनी केवळ १३ महिन्यांची अश्मिरा पिंजारी हिची शस्त्रक्रिया केली. (Cochlear implant surgery successful for first time in district nandurbar news)

अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसविले जाते. त्याद्वारे बाहेरील ध्वनिलहरीचे इलेक्ट्रिक ध्वनिलहरीत रूपांतर होऊन जन्मजात कर्णबधिर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते.

यापूर्वी या शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारच्या रुग्णाला नाशिक, मुंबई, पुणे येथे जावे लागत असे; परंतु बरेचसे पालक मोठ्या शहरापावेतो जाण्यास तयार नसत. त्यामुळे बऱ्याच बालकांना कर्णबधिरता निदान व उपचारासाठी मुकावे लागत होते. नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच बालकांना जन्मतात बहिरेपणा आहे. अशा रुग्णांसाठी ही सर्जरी एक वरदानच असते.

डॉ. हेतल पटेल या देशांतर्गत कॉक्लियर इम्प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम राबवितात, तसेच मुंबई येथे केईएम हॉस्पिटलमध्ये नित्यनेमाने देश-विदेशातील ईएनटी सर्जन यांना कॉक्लियर इम्प्लाट शस्त्रक्रियेबाबत ट्रेनिंग दिले जाते. डॉ. राजेश कोळीदेखील ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी होत असतात.

अत्याधुनिक साधनसामग्री आवश्यकता असलेल्या या शस्त्रक्रियेला भगवती हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेश कोळी व डॉ. तेजस्विनी कोळी यांनी पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

Dr. Rajesh Koli, Tejaswini Koli.
Nandurbar News : नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावावा : डॉ. हीना गावित

कॉक्लियर इम्प्लाट शस्त्रक्रियेसाठी एक टीम तयार करण्यात आली. ज्यामध्ये पीडियाट्रिशन, ॲनेस्थेशियालॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, क्लिनिकल ऑडिओलॉजिस्ट या पथकाने अतिशय चोखपणे कार्य केले.

जिल्ह्यात प्रथम अशी शस्त्रक्रिया झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमणे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय पटेल, डॉ. विशाल देसरडा, पूर्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदींनी टीमचे अभिनंदन केले.

संपूर्ण टीमचे यश

शस्त्रक्रियेसाठी धुळे येथील पिडियाट्रिक भूलतज्ज्ञ डॉ. जया दिघे, नंदुरबार येथील डॉ. किरण जगदेव, डॉ. गुलाब पावरा यांनी जबाबदारी पार पाडली. बालरोगतज्ज्ञ डॉ. भरतकुमार चौधरी, कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. प्रसाद अंधारे, क्लिनिकल ऑडिओलाजिस्ट डॉ. कल्पेश चौधरी, रेडिओलॉगिस्ट डॉ. गणेश पाकळे, पॅथोलॉजिस्ट डॉ. रवींद्र पाटील.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे संयोजक मनोहर धिवरे, अमरसिंग वसावे, नितीन मंडलिक, आबिद रंगरेज, मौलाना जकारिया रहेमानी, हाफिज अखलाक साहब मो. जमील तसेच भगवती हॉस्पिटलच्या स्टॉफ सिस्टर अलिशा गावित, भाग्यश्री वसावे, अर्चना नाईक, शमूवेल व केमिस्ट जागृती कृष्ण पटेल यांच्या प्रयत्नाने शस्त्रक्रिया पार पडल्याचे डॉ. राजेश कोळी यांनी सांगितले.

Dr. Rajesh Koli, Tejaswini Koli.
Nandurbar News : दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज : पालकमंत्री अनिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.