Dhule News : थंडीचा जोर हळूहळू वाढे, स्वेटर खरेदीकडे पावले

Amidst the growing cold, Tibetan vendors are also seen flocking to buy warm clothes.
Amidst the growing cold, Tibetan vendors are also seen flocking to buy warm clothes.esakal
Updated on

Dhule News : शहरासह जिल्ह्यात थंडी हळूहळू वाढत आहे. त्यामुळे स्वेटर, जॅकेट खरेदीसाठीही गर्दी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वेटर पाचशे ते दोन हजार, तर आठशे ते तीन हजार रुपयांपर्यंत जॅकेट बाजारात उपलब्ध आहे.

विशेषतः तिबेटियन विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी पाहायला मिळते.(cold is gradually increasing in city dhule news)

या वर्षी पाऊस कमी झाला. यंदा थंडीचे प्रमाणही कमी राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने वातावरण बदलले. गेले काही दिवस ढगाळ वातावरणही पाहायला मिळाले. त्यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीचा जोरही हळूहळू वाढत आहे. ८ डिसेंबरला कमाल २७, तर किमान १४.५ व ९ डिसेंबरला कमाल २७, तर किमान १३.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

रात्री वातावरण थंड होऊन सकाळपर्यंत गारवा राहत आहे. त्यामुळे विशेषतः सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांसह इतर मुला-मुलींच्या अंगावर स्वेटर पाहायला मिळत आहे. अनेक नोकरदार व इतर व्यावसायिक सकाळीच घराबाहेर पडतात. तेही उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत.

पाचशे ते तीन हजार किंमत

थंडी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विक्रेत्यांसह तिबेटियन विक्रेत्यांची उबदार कपड्यांचे स्टॉल्स लागले आहेत. स्वेटर, मफलर, कानपट्टी, शाल, जॅकेटचे अनेक प्रकार स्टॉल्सवर उपलब्ध आहेत. आठशे ते तीन हजारांपर्यत जॅकेटचा दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Amidst the growing cold, Tibetan vendors are also seen flocking to buy warm clothes.
Dhule News: ‘नार-पार’चे पाणी गिरणा खोऱ्यात वळवा; जल परिषदेतील सूर

तिबेटियन विक्रेत्यांच्या सर्व दुकानांवर एकच भावात कपड्यांची विक्री होत आहे. पाचशे रुपयांपासून दोन हजारांपर्यंत स्वेटर उपलब्ध आहेत. महामार्गालगत परराज्यातील विक्रेत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट विक्रीसाठी आणले आहेत. दरम्यान, सध्या स्वेटरचे दर कमी आहेत. मात्र, थंडी जशी वाढेल तशी दरातही वाढ होण्याची शक्यता असल्याचे विक्रेते म्हणतात.

टी-शर्ट स्वेटरला पसंती

शहरात महापालिकेशेजारी तसेच देवपूर भागात तिबेटियन विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर गरम कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चिमुकल्यांपासून ते शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींसह विविध वयोगटातील नागरिक खरेदीसाठी स्टॉल्सवर दिसत आहेत.

यंदा टी-शर्ट पद्धतीचे स्वेटर बाजारात आले आहेत. या स्वेटरला ग्राहक पसंती देत आहेत. त्यात चेक्स, डक शेफ, लाइट असे प्रकार आहेत. महिलांसाठी शक लाँग लेडीज अम्ब्रेला टाइपचे स्वेटर यंदा पहिल्यांदाच बाजारात आले आहे. त्यालाही महिलांकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Amidst the growing cold, Tibetan vendors are also seen flocking to buy warm clothes.
Dhule News: शिंदखेडा रेल्वेस्थानकावर सुविधांची वानवा; प्रवासी संघटनेने लक्ष वेधावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.