Dhule News : जिल्ह्यात 28 महसूल मंडळांत दुष्काळासंबंधी सवलती लागू : जिल्हाधिकारी गोयल

Collector Goyal appeal on Drought related concession applied in 28 revenue circles in district dhule news
Collector Goyal appeal on Drought related concession applied in 28 revenue circles in district dhule newsSakal
Updated on

Dhule News : जिल्ह्यात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले, अशा २८ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.

तसेच यासंबंधी आनुषंगिक सवलती लागू केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.(Collector Goyal appeal on Drought related concession applied in 28 revenue circles in district dhule news)

राज्य शासनाने १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या एकूण ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले अशा एकूण एक हजार २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करत विविध सवलती लागू करण्यास मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यातील तालुके

धुळे तालुक्यातील धुळे (शहर), आर्वी, सोनगीर, नगाव बुद्रुक, फागणे, मुकटी, धुळे (ग्रामीण), कुसुंबा, नेर (म.), लामकानी, शिरूड व बोरकुंड अशी १२ महसूल मंडळे, साक्री तालुक्यातील म्हसदी (प्र.), दुसाने, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, उमरपाटा, दहिवेल, साक्री व कासारे अशी नऊ महसुली मंडळे, तसेच शिरपूर तालुक्यातील शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी अशा सात महसूल मंडळांतील सर्व गावांसाठी या सवलती लागू राहतील.

Collector Goyal appeal on Drought related concession applied in 28 revenue circles in district dhule news
Dhule News: करवंदला 62 एकरांवर साकारणार वृक्षराजी; शासनाचा हिरवा कंदील

विविध सवलती लागू

सवलतींमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीनिगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

Collector Goyal appeal on Drought related concession applied in 28 revenue circles in district dhule news
Dhule News : धार्मिक पर्यटनस्थळास 3 कोटी : अनुप अग्रवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.