Dhule District Collector : कलेक्टर आयू रे आयू..! ग्रामस्थांचा एकच जल्लोष; स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिला लाल दिवा

Collector Abhinav Goyal present during the distribution of various certificates to students on the occasion of Revenue Week
Collector Abhinav Goyal present during the distribution of various certificates to students on the occasion of Revenue Week esakal
Updated on

Dhule District Collector : स्वातंत्र्यानंतर प्रथमच सामऱ्यादेवी (ता. शिरपूर) गावाने जिल्हाधिकाऱ्यांना पाहिले. महसूल सप्ताहातील अदालतीनिमित्त शुक्रवारी (ता. ४) सकाळी पावसात जिल्हाधिकारी अभिनव गोयल ‘लाल दिव्या’च्या कारमधून उतरले आणि कलेक्टर आयू रे आयू...असा आदिवासी बोलीभाषेत एकच गजर करीत त्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. ( Collector Goyal visited Shirpur Taluka on occasion of Revenue Week dhule news )

महसूल सप्ताहानिमित्त तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील सामऱ्यादेवीत महसूल अदालत झाली. यानिमित्त जिल्हाधिकारी गोयल यांनी प्रथमच शिरपूर तालुक्याला भेट दिली. प्रांताधिकारी सत्यम गांधी, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी एस. टी. सोनवणे उपस्थित होते.

झीरो पेंडन्सी कशी होईल?

तहसीलदार माळी यांनी उपक्रमांचा आढावा सादर केला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण झाले. श्री. गोयल म्हणाले, की योजनांमधील लाभार्थ्यांची वाढती संख्या स्वागतार्ह आहे; परंतु तेवढे करून झीरो पेंडन्सी साध्य होणार नाही. ज्यांना योजनांची काहीच माहिती नाही, ते लाभासाठी अर्ज करू शकत नाहीत.

त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीसोबत प्रत्येक समाजघटकापर्यंत योजनांचा प्रचार-प्रसार परिणामकारकतेने व्हावा. योजनेची माहिती, कोणता व कसा लाभ मिळेल हे सांगितल्याशिवाय उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यासाठी प्रसंगी आदिवासी बोलीभाषेचा वापर करता येईल, अशी सूचना त्यांनी यंत्रणेला दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Collector Abhinav Goyal present during the distribution of various certificates to students on the occasion of Revenue Week
Dhule Accident News : उड्डाणपुलावर डिझेल टँकर उलटला; डिझेल भरून नेण्यासाठी झुंबड

दाखल्यांचा उपयोग काय?

श्री. गोयल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना विविध दाखले, प्रमाणपत्रवाटप झाले. प्रत्येक दाखल्याच्या वितरणावेळी श्री. गोयल यांनी संबंधिताला डोमिसाईल, नॅशनॅलिटी म्हणजे काय, त्या दाखल्यांचा कोणता उपयोग आहे,

शिधापत्रिकेचे महत्त्व काय, अनुदानाची रक्कम कशी मिळते, असे प्रश्न विचारले. नंतर शिक्षक व अधिकाऱ्यांना उद्देशून त्यांनी सांगितले, की योजनांचा नेमका लाभ कसा मिळतो हे विद्यार्थी व लाभार्थ्यांना समजावून सांगावे. शिरपूरला प्रथमच ई-रेशनकार्ड वितरित झाले. या उपक्रमाबद्दल त्यांनी तहसीलदारांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना घातली गणिते

जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अचूक गणित सोडविणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या वाचनातील गतीचे त्यांनी निरीक्षण केले. शिक्षण हा आवडता विषय असल्याचे सांगून शाळेला वीजपुरवठा, सौरऊर्जा संयंत्राची सोय करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Collector Abhinav Goyal present during the distribution of various certificates to students on the occasion of Revenue Week
Dhule News: शहरात निकृष्ट कामे, पाणीही अद्याप गढूळच!

आरोग्य शिबिरात सिकलसेलसारख्या आजारांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली. यशवंत निकवाडे यांनी आभार मानले. नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी सुमन पावरा, पुरवठा अधिकारी बोरसे, तलाठी प्रकाश पावरा, लक्ष्मण गोपाळ यांनी संयोजन केले. दरम्यान, कोडीद (ता. शिरपूर) येथे सरपंच आरती पावरा, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश पावरा यांनी श्री. गोयल यांचे स्वागत केले.

चौदा पाड्यांमधील शाळा झोपडीत

सरपंच संगीता पावरा यांनी सजविलेला तीरकामठा देत श्री. गोयल यांचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. तालुक्यातील १४ पाड्यांमधील शाळा झोपड्यांमध्ये भरत असल्याच्या प्रकरणात सर्व यंत्रणांची समन्वय बैठक बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असे ‍आश्‍वासन श्री. गोयल यांनी दिले.

Collector Abhinav Goyal present during the distribution of various certificates to students on the occasion of Revenue Week
Dhule ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदेत आजपासून साडेतीनशेवर पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.