कापडणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त राज्यात चला नदीला जाणूया हे महत्वाकांक्षी अभियान सुरु आहे. जिल्ह्यातील बावीस किमी असलेल्या भात नदीचा समावेश झालेला होता. आता पांझरा या मोठ्या नदीचाही समावेश झाला आहे.
भात नदीचे पुनर्जीवन वन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात ग्रामस्थांचाही सहभाग महत्त्वपूर्ण आहे. नदीचे पुनर्जीवन ही लोक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केली. (Collector Jalaj Sharma statement Including manjira River along with bath River dhule news)
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चला जाणूया नदीया या अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीने जलयात्रा आणि जलदिंडी काढली. यावेळी एच. एस. बोरसे विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शर्मा मार्गदर्शन करीत होते. सरपंच सोनीबाई भिल अध्यक्षस्थानी होत्या.
पद्मश्री राहीबाई पोपेरे, गुलाबराव पाटील, नदी समन्वयक भिला पाटील, सहसमन्वयक उमेश पाटील, उद्यान पंडित नथ्थू माळी, जे. बी. पाटील, अर्जुन राऊत, शुभांगी पाटील, पांडुरंग पाटील, संभाजी बोरसे, नवल पाटील, धनूरचे सरपंच चेतन शिंदे, डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच महेश माळी, ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, संजय झेंडे, प्राचार्य आर. ए. पाटील, मुख्याध्यापक दीपक माळी, एम. पी. पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी नदीचे महत्त्व पटवून सांगितले.
समन्वयक भिला पाटील आणि उमेश पाटील यांनी नदी बारमाही करण्यासाठीच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. दरम्यान, भात नदी जलयात्रेनिमित्ताने एच. एस. बोरसे हायस्कूल, आदर्श कन्या विद्यालय, नूतन माध्यमिक विद्यालय, विनय प्राथमिक शाळा व श्रीविठ्ठल बाल भजनी मंडळाने जलदिंडी काढली. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच महेश माळी यांनी आभार मानले. ग्रामपंचायतीचे सदस्य व राजाराम फाउंडेशनने संयोजन केले.
अक्कलपाड्याचे पाणी भात नदीत : राम भदाणे
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे म्हणाले, अक्कलपाड्याचे पाणी गोंदूर तलावापर्यंत आले आहे. तेथून भात नदीचे उगमस्थान अवघ्या दीड दोन किमीवर आहे. तेथून पाटचारी जोडण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.