Nandurbar News : अश्वत्थामा यात्रेस प्रारंभ; भाविकांच्या संख्येत वाढ

Devotees leaving for Yatra from here. In the second photograph, the peak with the head of Sage Ashwatthama (Astamba).
Devotees leaving for Yatra from here. In the second photograph, the peak with the head of Sage Ashwatthama (Astamba).esakal
Updated on

Nandurbar News : सातपुड्यातील उंच-उंच डोंगर, दोन्ही बाजूला असलेली हजारो फूट खोल दरी तसेच नागमोडी, खडतर रस्ता असा शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी व तरुणाईला खुणावणारी अश्वत्थामाच्या यात्रेस सुरवात झाली असून या यात्रेसाठी तळोद्यातून भाविकांचे जथ्थे जाण्यास प्रारंभ झाला आहे.

मनसोक्त भटकण्याची तसेच निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी अश्वत्थामाची (अस्तंबाची) यात्रा म्हणजे एक जणू पर्वणीच असते.(Commencement of Ashwatthama Yatra in nandurbar news)

दरवर्षी धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजनचा दरम्यान अश्वत्थामाची यात्रा भरते. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील अनेक गावांमध्ये प्रसिद्ध आहे. काही भाविक व पर्यटक वसूबारसचा दिवसापासूनच या यात्रेला जातात.

प्रत्येक वर्षी हजारोंचा संख्येने भाविक अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ घेऊन, तळोदा येथून पदयात्रेसाठी रवाना होत असतात. समुद्रसपाटीपासून चार हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे मुख्यस्थान आहे.

देरानी, जेठानी, गोऱ्यामाळ, सातघोल, नकट्यादेव, काकडीस्थान, जुना अस्तंबा, भिमकुंड, अस्तंबा टेकड़ी, डुगडुग्या पत्थर, मामा भांजा, देवनदी, चांदसैली, घोलेघोल, माकड टेकडी, कोठारची सपाटी आणि शेवटी कोठार अश्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस पाहणारा प्रवास करुन ही यात्रा पायी पूर्ण होते.

पदयात्रे दरम्यान भाविकांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ही यात्रा पायी पूर्ण करताना अनेकांची चांगलीच दमछाक होते आणि म्हणूनच ही यात्रा पायी पूर्ण करणे म्हणजे भाविकांपुढे एक आव्हानच असते.

Devotees leaving for Yatra from here. In the second photograph, the peak with the head of Sage Ashwatthama (Astamba).
Nandurbar News : दिवाळी फराळवाटप; सामाजिक भानामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड

मात्र निसर्गरम्य वातावरणामुळे अस्तंबा ऋषींच्या यात्रेचे अनेकांना आकर्षण आहे. खान्देशात प्रसिद्ध असलेल्या अश्वत्थामाच्या यात्रेस सुरवात झाली असून या यात्रेसाठी भाविकांचे जथ्थे जाण्यास सुरवात झाली आहे.

महाभारतात उल्लेख

अश्वत्थामा (अस्तंबाचा) यांचा महाभारतात उल्लेख असून सातपुडयाच्या कुशीमध्ये उंच शिखरावर असल्याचे दिसून येते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वत्थामा आजही यात्रेवर येणाऱ्या पदयात्रेकरुंना विविध रुपात भेटतो. वेळप्रसंगी संकटात सापडलेल्या यात्रेकरुंना मार्गदर्शन करतो अशी अस्तंबा ऋषींबाबत दंतकथा आहे.

दुचाकीवर जाणाऱ्यांची संख्या वाढली

काही वर्षांपूर्वी अस्तंबा ऋषींच्या यात्रेला भाविक पदयात्रा करीत जात होते. मात्र अस्तंबा ऋषीचे मुख्यस्थान असलेल्या शिखराचा पायथ्यापर्यंत आता थेट चारचाकी, दुचाकीने जाण्याची सोय झाल्याने मोठ्या संख्येने भाविक दुचाकीने यात्रेला जातात.

Devotees leaving for Yatra from here. In the second photograph, the peak with the head of Sage Ashwatthama (Astamba).
Nandurbar News : 17 लाभार्थ्यांना कामाच्या आदेशांचे वितरण; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.