Nandurbar Crime News : तक्रारदारच निघाला आरोपी! स्थानिक गुन्हे शाखेकडून घटनेचा उलगडा...

complainant  in  police investigation is  mastermind of fake robbery Nandurbar Crime News
complainant in police investigation is mastermind of fake robbery Nandurbar Crime Newsesakal
Updated on

Nandurbar Crime News : किराणा मालाची उधारी जमासाठी गेलेल्या किराणा व्यापाऱ्याकडे काम करणारा कामगारच उधारीचे जमा झालेले पैसे रस्त्यात दरोडेखोरांनी पळविल्याचा बनाव करून व्यापाऱ्यासह पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

तशी तक्रार संबंधित कामगाराने पोलिसांत दिली. मात्र पोलिसांच्या तपासात वसुलीसाठी गेलेला (कामगार) तक्रारदारच त्या बनावट दरोड्याचा सूत्रधार निघाल्याचे स्पष्ट झाले.

त्याच्यासह या कटात सहभागी असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. (complainant in police investigation is mastermind of fake robbery Nandurbar Crime News)

शहरातील कन्यादान मंगल कार्यालयाजवळ कल्पेश हस्तीमल जैन (वय ३६, रा. वैशालीनगर, नळवा रोड, नंदुरबार) यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. ७ ऑगस्टला त्यांच्या दुकानावर काम करणारा राजेंद्र हिरालाल माळी (रा. सुंदर्दे, ता.जि. नंदुरबार) याला कल्पेश जैन यांनी लगतच्या गुजरातमधील कुकरमुंडा, वेलदा, निझर, वाकाचार रस्ता येथील किरकोळ किराणा दुकान, व्यापारी यांच्याकडून किराणा मालाचे उधारीचे पैसे वसुलीसाठी पाठविले होते.

राजेंद्र माळी याने तेथून सुमारे एक लाख ३० हजार रुपये रक्कम गोळा केली. नंदुरबार येथे येत असताना अडची ते लोणखेडा मार्गावर दुपारी अडीचच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या चार-पाच अज्ञात व्यक्तींनी अडवून त्यांपैकी काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीने डोळ्यात मिरचीपूड भिरकावून पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली, अशी माहिती राजेंद्र माळी याने कल्पेश जैन यांना कळविली. त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे यांनी घटनेची माहिती पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना दिली. तसेच घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

complainant  in  police investigation is  mastermind of fake robbery Nandurbar Crime News
Jalgaon Crime News : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणे अंगलट; वकिलाविरूद्ध गुन्हा

पोलिस अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या गुजरातमधील तापी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांनादेखील नाकाबंदी लावण्याबाबत आदेशित केले. स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलिस ठाण्याची चार पथके तयार केली.

त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करीत तक्रारदार राजेंद्र माळी यास काही प्रश्न विचारले असता त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती दिसून आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना आदेशित करून राजेंद्र माळी याची सखोल चौकशी करण्यास सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस खाक्या दाखविताच राजेंद्र माळी याने त्याचा साथीदार राजू देवीदास महाजन (माळी) (रा.लहान माळीवाडा, सिद्धार्थ चौक, नंदुरबार) याच्या मदतीने जबरी चोरीचा बनाव करून प्रकार घडवून आणल्याबाबत सविस्तर माहिती दिली.

complainant  in  police investigation is  mastermind of fake robbery Nandurbar Crime News
Nandurbar Crime News : मीदेखील घरीच जात आहे सांगत गाडीत बसविले अन... महिलेचा विनयभंग

तसेच त्यास रोख रकमेबाबत विचारपूस केली असता ते पैसे राजू महाजन याच्याकडे असल्याबाबत सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजू देवीदास महाजन (माळी) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख ३८ हजार ६५० रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेले ७० हजार रुपये किमतीची दुचाकी व राजेंद्र माळी याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण दोन लाख ४८ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अवघ्या दोन तासांत ताब्यात घेऊन

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.

complainant  in  police investigation is  mastermind of fake robbery Nandurbar Crime News
Nandurbar Bribe Crime : दोन कनिष्ठ सहाय्यक अडकले लाचेच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.