दोंडाईचा : दोंडाईचा परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात कापूस काढणीला आला होता. आता पाऊस पडल्याने कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापूस पिकाला परतीच्या पावसाने फायदा झाला आहे. (Concern among horticultural farmers due to return of rains Dryland farmers advantage dhule news)
गेल्या अनेक दिवसापासून शिंदखेडा तालुक्यात जोरदार पाऊस झालाच नाही. मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाचे उत्पादन निघायला सुरवात झाली आहे. ऐन कापूस काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
परिसरातील मालपूर, सुराय चुडाणे, अक्कलकोस, रामी, पथारे ,झिरवे ,धावडे, कर्ले परसुळे, खर्दे, मांडळ या भागात यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. नदी नाले ओढे यंदा जोरदार पावसाच्या अभावी वाहिलेच नाही.
परिणामी बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठायला सुरवात झाली आहे. साठवण बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. यंदा सुरवातीपासूनच पाऊस लांबणीवर पडला होता. कोरडवाहू शेतकऱ्यांनी जेमतेम भीज पावसावर कापूस पीक लागवड केली.
ज्वारी, बाजरी ,मूग ,उडीद आदी पिकाच्या पेरण्या घटल्याने हंगामाला शेतकरी मुकला आहे. अपेक्षित उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणामुळे मिळणे शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.