Dhule Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे.
यात धुळे लोकसभा मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवारीसाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, डॉ. तुषार शेवाळे यांची नावे आघाडीवर आहेत.
दरम्यान, धुळे लोकसभेची जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास माजी मंत्री तथा काँग्रेसचे निरीक्षक प्रा. वसंत पुरके यांनी येथे व्यक्त केला. (Congress Prof Vasant Purke statement about winning dhule lok sabha election)
प्रा. पुरके यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नेते, पदाधिकाऱ्यांची शहरातील काँग्रेस भवनात बैठक झाली. त्या वेळी प्रा. पुरके यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, की आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक कार्यकर्त्यांची मते बैठकीत जाणून घेण्यात आली. उमेदवार कोणीही असला तरी धुळे लोकसभेची जागा काँग्रेस ताब्यात घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आमदार पाटील, जिल्हाध्यक्ष सनेर, डॉ. शेवाळे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. लवकर उमेदवार दिल्यास कामाला सुरवात केली जाईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून दुसरीकडे गेले आहेत त्यांना शांताबाईची उपमा देत त्यांनी खिल्ली उडविली.
ते पुन्हा पक्षात आल्यास त्यांचे स्वागत असेल, असे सांगत मात्र त्यांना पारखूनच घेऊ, असेही ते म्हणाले. ईव्हीएम मशिनला आमचा शंभर टक्के विरोध आहे.
बूथनिहाय कार्यकर्त्यांचे सुरू असलेले काम समाधानकारक असल्याचे प्रा. पुरके म्हणाले. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे, युवराज करनकाळ, माजी खासदार बापू चौरे, डॉ. तुषार शेवाळे, वसंत सूर्यवंशी, रमेश श्रीखंडे, प्रमोद सिसोदे, मुजफ्फर हुसेन, साबिर शेठ, पीतांबर महाले, प्रवीण पवार, महेंद्र देसले, नितीन देसले, दगा सोनवणे, महेंद्र भदाणे, नेवा पठाण, किशोर पाटील, रोहिदास वाघ, आनंदा पवार, निंबा वाघ, प्रमोद बोरसे, विजय पाटील, भगवान गर्दे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.