Dhule News : नवीन शौचालये सुरू न करण्यामागे काय इंटरेस्ट? सार्वजनिक शौचालयांचा प्रश्‍न

for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news
for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news esakal
Updated on

Dhule News : महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील सार्वजनिक शौचालये बांधून पूर्ण झालेली असताना व त्या-त्या प्रभागातील नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून ही शौचालये सुरू करण्याची मागणी करत असताना ती सुरू होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. (construction of public toilets in extension area of municipal corporation has been completed but they are not in use dhule news)

संबंधित शौचालये आमच्याकडे हस्तांतरित झाले नसल्याचे उत्तर सार्वजनिक स्वच्छता विभागाकडून दिले जाते. दरम्यान, १२ पैकी सहा शौचालये बांधकाम विभागाने दोन-तीन दिवसांपूर्वीच स्वच्छता विभागाकडे हस्तांतरित केली आहेत. उर्वरित सहा शौचालयांचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे.

शहरासह हद्दवाढ क्षेत्रात इतर विविध सोयी-सुविधांसोबतच शौचालयांची समस्याही मोठी आहे. गेल्या काही वर्षात शासन अनुदानातून वैयक्तिक शौचालयांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. शासन-प्रशासनाकडून सार्वजनिक शौचालयांऐवजी वैयक्तिक शौचालयांनाच प्राधान्य देण्यात येत आहे.

वैयक्तिक शौचालयांसाठी आग्रह असला तरी अनेक भागात जागेच्या समस्येमुळे वैयक्तिक शौचालये उभारणीस अडचणी आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचा वापर होतो. धुळे शहरात आजही अनेक सार्वजनिक शौचालयांचा वापर त्या-त्या भागातील नागरिक करतात. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी या शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी वारंवार होतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news
Summer Season : उन्हाचा कडाक्यासोबत श्‍वसनाच्या त्रासाने मृत्यूचे प्रमाणही वाढले

एकीकडे जी शौचालये अस्तित्वात आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्‍न कायम असताना दुसरीकडे काही ठिकाणी नवीन शौचालये उभी राहिली आहेत. ही नवीन शौचालये मात्र सुरू होत नसल्याचे चित्र पाहायला मिळते.

नगरसेवकांची मागणी दुर्लक्षित

विशेषतः हद्दवाढ क्षेत्रात नवीन सार्वजनिक शौचालये उभी राहिली आहेत. ही शौचालये बांधून तयार असताना ती सुरू का करत नाहीत असा त्या-त्या प्रभागातील नागरिकांसह नगरसेवकांचा प्रश्‍न आहे. गेल्या अनेक स्थायी समिती सभा, महासभांमध्ये संबंधित भागातील नगरसेवकांनी ही शौचालये का सुरू करत नाहीत याची उत्तरे प्रशासनाकडे मागितली.

मात्र, यावर प्रशासनाकडून ठोस उत्तरे मिळालेली नाहीत. संबंधित शौचालये आमच्या विभागाकडे अद्याप हस्तांतरित झालेली नाहीत अशी भूमिका महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छता विभागाचे अधिकारी करताना दिसतात. यापलीकडे हा विषय जात नाही.

for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news
NMC News: मुंबई नाका ते काठेगल्लीपर्यंत गतिरोधक; नागरिकांच्या मागणीला वाहतूक पोलिसांचा प्रतिसाद

सहा शौचालयांचे पत्र प्राप्त

दरम्यान, आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने हद्दवाढ क्षेत्रातील सहा शौचालये आमच्याकडे हस्तांतरित केली आहेत अशी माहिती स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील यांनी दिली. दोन-तीन दिवसांपूर्वीच याबाबत पत्र प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. यात वलवाडी, वरखेडी येथील प्रत्येकी दोन व अवधान, बाळापूर येथील प्रत्येकी एका शौचालयाचा समावेश आहे. ही शौचालये सुरु करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.

प्रक्रिया अद्याप बाकी

दरम्यान, यानंतरही अद्याप उर्वरित सहा शौचालयांच्या हस्तांतराची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. वलवाडी, मोराणे, चितोड, वरखेडी, महिंदळे या भागातील ही शौचालये आहेत. या शौचालयांचे हस्तांतर आता कधी होईल याची प्रतीक्षा आहे.

केवळ हस्तांतरामुळे शौचालयांचे प्रश्‍न प्रलंबित राहतात की आणखी काही इतर कारणे त्यामागे आहेत याचाही खुलासा होणे आवश्‍यक आहे. सार्वजनिक शौचालये बांधून तयार झालेली असताना ती सुरू न होण्यामागे काय कारणे असतील याचा जाब विचारण्याची गरज आहे.

for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news
Dhule News : धुळ्यात विलंबासह दूषित पाणी; दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या नागरिकांच्या तक्रारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.