Farmer Helpline : कृषी यंत्रणेमार्फत नियंत्रण कक्ष कार्यान्वित; ई-मेल, व्हॉट्सॲपसह मोबाईल, टोल फ्री क्रमांक जाहीर

Farmer Helpline
Farmer Helplinesakal
Updated on

Farmer Helpline : खरीप हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, अडचणींच्या निवारणासाठी कृषी आयुक्तालयावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे. शेतकऱ्यांना चोवीस तास तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केल्याची माहिती कृषी यंत्रणेतर्फे देण्यात आली. या सुविधेच्या लाभाचे आवाहन आहे.

राज्यासह जिल्ह्यात शेती क्षेत्राच्यादृष्टीने खरीप हंगामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बहुतांश शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात.

अशा वेळी गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व कीटकनाशके आदींचा पुरवठा वेळेत व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. (control room was made operational to solve problems and difficulties faced by farmers during Kharif season dhule news)

बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकरी उत्पादक, वितरक व विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींच्या निराकरणासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

संपर्कासाठी क्रमांक

कृषी नियंत्रण कक्षाशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी चोवीस तास संपर्क साधता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांसह संबंधितांना ८४४६१ १७५००, ८४४६२ २१७५०, ८४४६३ ३१७५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० यावरही संपर्क करता येईल.

अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलद्वारे नोंदविता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer Helpline
Govt Helpline : बालविवाह, अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी 'हा' हेल्पलाइन नंबर जाहीर

संबंधितांनी नमूद मोबाईल, टोल फ्री क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना तक्रादाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा.

माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठविल्यास संबंधितांच्या तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी संपर्क क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एकूण तीन मोबाईल, एक टोल फ्री क्रमांक व एक ई-मेल तक्रार निवारणासाठी समर्पित असून, त्यावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन कृषी संचालक (निवगुनि) विकास पाटील यांनी पत्रकाद्वारे केले.

Farmer Helpline
Nashik Women Helpline : महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांची हेल्पलाइन कार्यान्वित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.