Dhule Crime News : युवकाच्या खुनाचा 12 जणांविरुद्ध गुन्हा

युवकाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी नेऊन त्याला मद्यात प्राणघातक पदार्थ मिसळून पाजत खून केल्याच्या संशयावरून शहरातील १२ जणांविरोधात वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
crime
crimeesakal
Updated on

Dhule Crime News : युवकाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी नेऊन त्याला मद्यात प्राणघातक पदार्थ मिसळून पाजत खून केल्याच्या संशयावरून शहरातील १२ जणांविरोधात वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तेजस रवींद्र ईशी (चौधरी) असे मृत युवकाचे नाव असून, त्याचा २७ ते २८ ऑक्टोबर २०२२ दरम्यान इगतपुरी (जि. नाशिक) येथील मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. (Crime against 12 persons for murder of youth jalgaon news)

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने तेजसचे वडील तथा येथील कृषी विभागातील अनुरेखक रवींद्र जगन्नाथ चौधरी यांनी इगतपुरी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मित्राशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी हे कृत्य केल्याचा संशय चौधरी यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. तेजसचा मित्र ऋतिक जैन याचा २७ ऑक्टोबरला वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी तेजस व त्याचे मित्र मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये गेले होते.

२८ ऑक्टोबरला केतन भंडारी याने तेजसचे काका डॉ. सुनील चौधरी यांना फोन करून तेजसचा अपघात झाला असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले.

तेथील डॉक्टरांशी बोलल्यावर रुग्णालयात नेण्यापूर्वीच तेजसचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेजसच्या नातलगांनी नाशिक येथे जाऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. तेजसच्या मृत्यूबाबत त्याच्यासोबत गेलेले मित्र उडवाउडवीची उत्तरे देत होते.

crime
Nashik Crime News : बुलेटसह 5 दुचाक्या लंपास; दुचाकी चोरट्यांचे पोलीसांना आव्हान

गोळ्या दिल्याचा संशय

दरम्यान, डॉ. सुनील चौधरी यांनी केतन भंडारी याचा फोन तपासला असता त्याने एकाला चार वेगवेगळ्या प्रकारच्या दहा अशा एकूण ४० गोळ्या आणण्याचा संदेश पाठविल्याचे आढळले. तेजस आणि केतन भंडारी यांचे २०२२ मध्ये गणेशोत्सवादरम्यान भांडण झाले होते.

त्याचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करून मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये नेऊन मद्यात प्राणघातक पदार्थ मिसळून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे आहेत संशयित

केतन राजेंद्र भंडारी, ऋतिक नरेंद्र ओसवाल, गौरव संजय जगताप, प्रेम प्रमोद जैन, सचिन जयवंत पाटील, भावेन पतंगराव मोरे, मयूर रवींद्र कोळी, चिंतन जितेंद्र ललवाणी, ऋषभ नरेश ओसवाल, मोहित राजेंद्र कढरे, आनंद शांतिलाल चोरडिया व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. शिरपूर, जि. धुळे).

crime
Nashik Crime News : बेरोजगार मित्राने उकळली मैत्रिणीकडून खंडणी; मुंबई नाका पोलिसात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.