Dhule Crime : लळिंगला हाणामारी; 8 जणांवर गुन्हा

beating
beatingesakal
Updated on

Dhule News : लळिंग (ता. धुळे) येथे १५ मेस रात्री हाणामारी झाली. त्यात तीन जण जखमी झाले.

या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून संशयित आठ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Crime against 8 people in lalinga fight dhule crime news)

तुकाराम नाना पवार (रा. लळिंग) यांच्या फिर्यादीनुसार १४ मेस दिवाणमळा (ता. धुळे) येथे हळदीच्या कार्यक्रमात लहान भाऊ अजय यास मारहाण का केली, असा जाब विचारला.

त्याचा राग येऊन १५ मेस रात्री आठच्या सुमारास लळिंग गावातील महादेव मंदिराजवळ काशीनाथ गिरधर सोनवणे, सुरेश गिरधर सोनवणे, सत्पाल गिरधर सोनवणे व सोजाबाई सत्पाल सोनवणे (सर्व रा. लळिंग) यांनी लाकडी दांडक्याने तुकाराम पवार व त्याचा भाऊ अजय पवार, काकू ताईबाई पवार यांना डोक्यावर मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

beating
Dhule Crime News : एलसीबीकडून तिघा चोरट्यांना अटक; तपासात न्याहळोदलाही कारवाई

बहीण गीताबाई पवार हिला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. मारहाणीत दोघे जखमी झाले. या प्रकरणी संशयित चौघांवर गुन्हा नोंद झाला.

परस्परविरोधात काशीनाथ गिरधर सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार मागील भांडण्याची कुरापत काढून संभाजी सोनू पवार याने लाकडी काठीने कपाळाच्या डाव्या बाजूस मारून जखमी केले.

तसेच तुकाराम नाना पवार, अजय नाना पवार, भय्या नाना पवार यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. त्यानुसार संशयित चौघांवर गुन्हा दाखल झाला.

beating
Dhule Crime : मुंबईच्या दोघांना 20 किलो गांजासह अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.