संग्रामपुर ,बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत अभयारण्याची निर्मिती आहे. सदर अभयारण्यात असलेल्या वनसंपदा आणि वन्यजीव यांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र असे दोन विभाग कार्यरत आहेत .असे असताना सोनाळा ,टुनकी ,बावनबीर , वसाडी ,ह्डयामाळ , लाडनापुर यासह सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तालुक्यातील सर्वच गावांमधील शेतशिवारामध्ये हरण ,ससे, रानडुक्कर यांची सर्रास दिवस रात्रभर शिकार करण्यात येत आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे हे शिकारी शिकारासमवेत वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या शेतामधील स्पिंकलर पाईप, केबल, मीटर पेटी यासह अन्य साहित्याची चोरी सुद्धा करीत आहेत. त्यामुळे परिसरातील या शिकाऱ्यांना शेतकरी त्रस्त झालेले आहेत नामवंत शिकारी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकार करून ही शिकार तुमच्या सांगण्यावरून मी केलेली आहे व मी तुम्हाला खोट्या गुन्हा अडकविल अशा धमक्या सुद्धा देत आहेत.
मात्र या गंभीर बाबीकडे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद व त्यांचे कर्मचारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांसह परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. या गंभीर बाबीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांनी तात्काळ लक्ष देऊन वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकारींना तात्काळ जेरबंद करण्यात यावे यामुळे वन्यप्रेमी मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे .
परिसरात शिकारीसोबत मोठ्या भुरट्या चोरांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. सोबतच रानडुकराच्या शिकार करून त्यांच्या अवैद्य पणे मासाची विक्री सुद्धा होत आहे. तसेच हरणाच्या मासाची विक्री सुद्धा चोरट्या मार्गाने शिकार केल्यानंतर होत आहे .सोबतच हरणांच्या कातड्याची सुद्धा तस्करी या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असावी अशी शंका आहे. यासाठी फार मोठे रॅकेट सक्रिय असून पुराव्या अभावी सर्व काही आलबेल दिसत आहे.
या अगोदर सुद्धा वसालीजवळ अस्वलाची शिकार करून त्याचे गुप्तांग कापून त्याची तस्करी झाल्याची घटना घडलेली आहे .ते हे शिकारीस तर नाही ना त्या घटनेपासून त्या शिकारींचा आजपर्यंत ही वन्यजीव विभागाकडून कोणत्याच प्रकारे तपास लागलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.यामुळे वन्यप्रेमी व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांकडून संबंधित विभागाच्या कारभारा बाबत तीव्र नाराजी चा सूर आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.