Dhule Municipality News : अवैध नळजोडणी केल्यास गुन्हे दाखल करणार; नागरिकांसह कारागिरांना धुळे मनपाचा इशारा

महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशाने शहरातील मुख्य जलवाहिन्यांवरील अवैध नळ जोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेतली
Crimes will registered in case of illegal pipe connection Dhule Municipality warning to artisans along with citizens
Crimes will registered in case of illegal pipe connection Dhule Municipality warning to artisans along with citizens esakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशाने शहरातील मुख्य जलवाहिन्यांवरील अवैध नळ जोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

गुरुवारी (ता.११) अशा चार ते पाच अवैध नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. दरम्यान, अशाप्रकारे अवैध नळजोडण्या घेतल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आला आहे. (Crimes will registered in case of illegal pipe connection Dhule Municipality warning to artisans along with citizens news)

धुळे शहरात अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या सर्वश्रुत आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे शहरवासीयांना सुरळीत पाणी देताना यंत्रणेची दमछाक होते. दरम्यान, आता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली.

तसेच पाणीपुरवठा विभागाला नवनीत सोनवणे यांच्या रूपाने स्वतंत्र कार्यकारी अभियंता मिळाला आहे. त्यामुळे एकत्रित प्रयत्नांतून शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहराच्या बहुतांश भागात सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचा मनपा यंत्रणेचा दावा आहे.

दरम्यान, या प्रयत्नात शहरातील अवैध नळ जोडण्यांची समस्याही अडथळा ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यातही विशेषतः मुख्य जलवाहिन्यांवर देखील अवैध नळजोडण्या घेऊन घरात २४ तास व जास्त दाबाने पाणी उपलब्ध करण्याचा उपद्व्याप अनेक जणांकडून होत असल्याचे पाहायला मिळाले.

पाच जोडण्या खंडित

धुळे मनपा आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांच्या आदेशाने मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे मुख्य जलवाहिन्यांवरील अवैध नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गुरुवारी (ता.११) शहरातील मनपा शाळा क्रमांक २८ येथील जलकुंभाला येणाऱ्या व जाणाऱ्या जलवाहिन्यांवरील चार ते पाच अवैध नळजोडण्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी खंडित केल्या.

Crimes will registered in case of illegal pipe connection Dhule Municipality warning to artisans along with citizens
Dhule Municipality News : निर्धारित जागेकडे हॉकर्स फिरकले नाहीत; महापालिकेची कसोटी

तसेच संबंधितांना पुन्हा अशा प्रकारे अवैध नळजोडणी करू नये अशी समज देण्यात आली. सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, कनिष्ठ अभियंता मोहित मुजावर, गौरव पाटील, भूषण ढवळे आदींनी ही कारवाई केली.

वेळप्रसंगी गुन्हे दाखल करणार

शहरातील नागरिक व अवैध नळजोडणी करून देणाऱ्या नळ कारागीर नाही मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे इशारा देण्यात आला आहे. यापुढे कुणीही मुख्य जलवाहिन्यांवर अवैध नळजोडणी घेतल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे महापालिका पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

मोठ्या लोकांवरही कारवाई व्हावी

शहरात मुख्य जलवाहिन्यांवर अनेक भागात अवैध नळजोडण्या आहेत. अनेक बड्या हस्तींकडे, पेठ भागात देखील मुख्य जलवाहिन्यांवर अवैध नळजोडण्या असल्याचे, काहीजण तर मनपाच्या पाण्यावर व्यवसायही करतात असे सांगितले जाते.

त्यामुळे मनपा यंत्रणेने अशा लोकांकडेही वक्रदृष्टी टाकण्याची हिंमत दाखविण्याची गरज आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त नामदेव भोसले यांच्या कार्यकाळातही याबाबत कारवाई झाली होती.

Crimes will registered in case of illegal pipe connection Dhule Municipality warning to artisans along with citizens
Dhule Municipality News : 15 टन कचरा काढला, महापालिका धुतली; मनपातर्फे शहरात महास्वच्छता अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.