Nandurbar Crime News: धुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार जाळ्यात; उत्तर महाराष्ट्रातील 14 गुन्हे उघड

crime news
crime newsesakal
Updated on

नंदुरबार : नंदुरबारसह नाशिक व धुळे जिल्ह्यांत ठिकठिकाणी घरफोडी व गंडा घालणारा भडणे (ता. साक्री) येथील भामटा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा जाळ्यात अडकला आहे. कसून चौकशीअंती त्याच्याकडून घरफोडीचे १४ गुन्हे उघड झाले असून, ६३ हजार रुपये किमतीचा दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (criminals in Dhule district 14 Crimes Revealed in North Maharashtra Nandurbar Crime News)

याबाबत नंदुरबारचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार शहरात दुधाळे शिवारातील कोकणी हिल भागात आयडीबीआय बँकेजवळ एकजण विनानंबरच्या मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरत होता.

ही माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना दिली. त्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बँक परिसरात जाऊन संबंधितास ताब्यात घेतले. विजय रमेश दाभाडे (वय २९, रा. इंदिरानगर, भडणे) असे या संशयिताचे नाव असून, मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

त्यामुळे झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात चांदीचे पाच हजार रुपये किमतीचे पायातील दोन व हातातील दोन गोलाकार कडे, आठ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे ओम पदक, तसेच मोटारसायकलची किक असलेल्या बाजूला एक लोखंडी टॉमी आढळून आला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

crime news
Nashik Crime News: बसस्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट; महामार्गावर दीड लाख तर, ठक्कर बाजारला आयफोन चोरीला

एक ते दीड वर्षापूर्वी रात्रीच्या वेळी नवापूर शहरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केलेले हे दागिने नंदुरबार शहरात विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. नवापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालासोबत या दागिन्यांची पडताळणी केली असता, हे तेच दागिने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दागिन्यांसह मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दरम्यान, विजयने मागील दोन वर्षांत नंदुरबार शहरातील कोकणी हिल, माळीवाडा, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, जायखेडा, धुळे जिल्ह्यातील साक्री, तसेच साक्री तालुक्यातील म्हसदी, देऊर, धाडणे, मालपूर, कासारे, शेवाळी, पिंपळनेर, दहिवेल येथे रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलूप तोडून केलेल्या चोऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

त्याच्याविरुद्ध मालमत्तेचे दोन, नाशिक जिल्ह्यातील दोन व धुळे जिल्ह्यातील दहा, असे एकूण १४ गंभीर गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

crime news
Crime News : कर्जास कंटाळून दोन मित्रांनी झाडाच्या एकाच फांदीला घेतला गळफास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.