Crop Insurance Scheme : जिल्ह्यात 9 हजार शेतकऱ्यांकडून पीकविमा; नंदुरबार तालुका अव्वल

Crop insurance scheme
Crop insurance schemeesakal
Updated on

Crop Insurance Scheme : खरीप हंगामातील पिकांसाठी शासनाच्या एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी अवघे पाच दिवस मुदत शिल्लक असून, जिल्ह्यात आजपर्यंत अवघ्या नऊ हजार ४४७ शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला आहे.

त्यात नंदुरबार तालुका अव्वल असून त्यापाठोपाठ अक्रानी, तर सर्वाधिक कमी प्रतिसाद शहादा व तळोदा तालुक्यातून मिळाला आहे. वास्तविक पाहता या दोन्ही तालुक्यात मोठे बागायतदार शेतकरी असूनही पिक विमा काढण्यात अद्यापही उदासिनता दिसून येत आहे. (Crop insurance from 9 thousand farmers in district nandurbar news)

हवामानातील बदल, वेळीअवेळी पडणारा पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते. यासाठी शासनाने अवघ्या एका रुपयात पंतप्रधान पीकविमा योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या प्रचार व प्रसार ही मोठ्या प्रमाणावर केला आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.

३१ जुलै अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून या योजनेत शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे .परंतु जिल्ह्यात शहादा व तळोदा तालुका सधन शेतकरी व मोठे बागायतदारांच्या तालुका म्हणून ओळखला जातो. प्रयोगशील शेतकरी आहेत.

परंतु येथील शेतकऱ्यांची संख्या पाहता अद्यापही या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळत नाही. यात विमा काढण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहे की शेतकऱ्यांची अनास्था हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. कोणतेही संकट सांगून येत नाही संकटकाळी हा विमा निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. यासाठी शेतकऱ्यांनी काढून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crop insurance scheme
PM Crop Insurance Scheme : केवळ 1 रुपया भरा अन् पीकविमा योजनेत सहभागी व्हा!

जिल्ह्यातील तालुकानिहाय विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या

अक्कलकुवा : ५५४

अक्राणी : ३१३३

नंदुरबार : ३६०७

नावपूर : ६४६

शहादा : १३८४

तळोदा : १२३

एकूण: ९४४७

"शहादा तालुक्यात या योजनेला शेतकऱ्यांच्या संख्येच्या मानाने कमी प्रतिसाद मिळत आहे. वास्तविक जिल्ह्यात तालुका कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा." -काशीराम वसावे (तालुका कृषी अधिकारी, शहादा)

"पंतप्रधान पीकविमा योजनेत केवळ एक रुपया भरावा लागणार आहे .यासाठी सीएससी सेंटरवर सुविधा उपलब्ध आहे. अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा." -दीपक गिरासे (तहसीलदार, शहादा)

Crop insurance scheme
PM Crop Insurance Scheme : अधिक रक्कमेची मागणी केल्यास संपर्काचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.