Dhule News : सायकलवीर डॉ. सुनील नाईक ‘विक्रमादित्य’! पाचव्यांदा सुपर रेन्डोनर किताब

Dr. Sunil Naik
Dr. Sunil Naik esakal
Updated on

Dhule News : वयाच्या ६५ व्या वर्षी स्पर्धात्मक सायकलिंगमध्ये तब्बल १५ हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार करत येथील उमदे व्यक्तिमत्त्व, विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनील नाईक यांनी पाचव्यांदा सुपर रेन्डोनर पुरस्कार मिळविला आहे.

त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धुळे शहरात २० डिसेंबर २०१५ ला सायकलिंगची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. (Cyclist Dr Sunil Naik achieve fifth time Super Randonneur title dhule news)

यानंतर धुळे सायक्लिस्ट ही आरोग्यदायी चळवळ पुढील काही वर्षांत नावारूपाला आली आहे. देशभरातील अनेक सायक्लिस्ट मंडळींनी धुळ्याच्या सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नवनवीन विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यामुळे अनेक उमदे सायकलवीर नावारूपाला आले.

आतापर्यंत शेकडो सायक्लिस्ट धुळ्यात रेन्डोनर पुरस्कार आणि ५० च्या आसपास सायक्लिस्ट सुपर रेन्डोनर पुरस्कार प्राप्त करते झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्लब सदस्य

एका कॅलेंडर वर्षात सायकलिंग करीत २००, ३००, ४००, ६०० किलोमीटरच्या सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ठराविक वेळेच्या आत अंतर पूर्ण करणाऱ्या सायकलवीराला सुपर रेन्डोनर, अशी मानद उपाधी फ्रान्समधील ऑडॅक्स या सायकल क्लबतर्फे दिली जाते.

धुळे सायक्लिस्ट या आंतरराष्ट्रीय क्लबचा सदस्य क्लब आहे. या सर्व निवडक मंडळींतून एक नाव जे अतिशय नियमितपणे, सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सायकलिंग करीत आहेत ते म्हणजे डॉ. सुनील नाईक..!

Dr. Sunil Naik
Dhule News : जिल्ह्यातून 2 कोटींचा दंड वसूल; गौणखनिज उत्खनन, वाहतूक साठ्याप्रकरणी महसुली कारवाई

नाईक यांची कामगिरी

डॉ. नाईक २० डिसेंबर २०१५ ला झालेल्या दोनशे किलोमीटर अंतर स्पर्धेत होते आणि १६ सप्टेंबर २०२३ च्या चारशे किलोमीटर अंतर स्पर्धेतही होते.

सरासरी आठ वर्षांच्या कालावधीतील आकडेवारी पाहिली तर त्यांनी शंभर किलोमीटरच्या चार, दोनशे किलोमीटरच्या १२, तीनशे किलोमीटरच्या आठ, चारशे किलोमीटरच्या सहा, सहाशे किलोमीटरच्या सहा, हजार किलोमीटरच्या एक अशा विविध देश-विदेशातील एकूण ३९ सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घेत तब्बल १५ हजार किलोमीटरहून अधिक अंतर सायकलीने पार करीत विक्रमी पाचव्यांदा सुपर रेन्डोनर किताब प्राप्त केला आहे.

त्यांच्या या विक्रमामुळे धुळे सायक्लिस्टच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे डॉ. नाईक यांचे वय ६५ असूनही त्यांचा हा सायकलप्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे.

वैद्यकीय व्यवसायात प्रामाणिकतेने व्यस्त आणि यशाच्या शिखरावर असतानाच सायकलिंगमध्येही शिखर गाठण्याची डॉ. नाईक यांची ही विजिगिषू वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Dr. Sunil Naik
Dhule News : उच्चदाब वीजवाहिनी अभावी अतिदक्षता विभाग ओसाडच; धुळे ‘सिव्हिल’ची स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.