Dhule Crime News : मारहाणीतील जखमीचा मृत्यू; 11 जणांवर खुनाचा गुन्हा

मागील भांडणातून जातोडा (ता. शिंदखेडा) येथे २९ डिसेंबरला दोन गटांत हाणामारी झाली.
Death of victim in beating Murder charged against 11 persons
Death of victim in beating Murder charged against 11 personsesakal
Updated on

Dhule Crime News : मागील भांडणातून जातोडा (ता. शिंदखेडा) येथे २९ डिसेंबरला दोन गटांत हाणामारी झाली.

त्यात लाकडी दांडके व दगडांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा रविवारी (ता. ७) मृत्यू झाला.(Death of victim in beating Murder charged against 11 persons)

मिय्यालाल नसीर पटेल असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात वाढीव कलमान्वये ११ संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले.

बानोबी मिय्यालाल पटेल (रा. जातोडा) यांच्या फिर्यादीनुसार मागील भांडणाच्या वादातून फारूक निंबा पटेल याने पती मिय्यालाल पटेल यांना लाकडाने मारहाण केली. त्यात ते पडल्यानंतर बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

तसेच बानोबी पटेल यांचा मुलगा अरमान पटेल, जुबेर पटेल, पुतण्या फिरोज पटेल यांनादेखील फारूक पटेल याच्यासह आसिफ निंबा पटेल, वसीम सलीम पटेल, दानिश शकील पटेल, शकील निंबा पटेल, अत्ताफ गनी पटेल, सलीम निंबा पटेल, भिक्या हबीब पटेल, साबीर हबीब पटेल, नदीम सलीम पटेल, सलीम हुसेन पटेल (सर्व रा. जातोडा) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले.

Death of victim in beating Murder charged against 11 persons
Dhule Crime News : 10 लाखांचा मद्यसाठा जप्त; निजामपूर पोलिसांची कारवाई

बानोबी पटेल यांची सून रुबिना भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून गहाळ झाली. भांडण सोडविल्यानंतरही शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी ११ संशयितांवर गुन्हा नोंद झाला होता.

तथापि, उपचार सुरू असताना गंभीर जखमी मिय्यालाल नसीर पटेल यांचा रविवारी (ता. ७) मृत्यू झाला. त्यावरून गुन्ह्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले.

Death of victim in beating Murder charged against 11 persons
Dhule Crime News : मोहाडी उपनगरात एकाच रात्री चोरीसत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()