Dhule Crime : मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी इंधनाबरोबर वापरले जाणारे ‘डीईएफ’चे बनावट द्रव्य तयार करायचा कारखाना साक्री पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला.
दहिवेल शिवारात टाटा कंपनीचे ‘डीईएफ’चे द्रव्य बनावट पद्धतीने तयार करायचा कारखाना असून, यात सुमारे नऊ लाख ५६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्यासह पथकाने कारवाई केली. (DEF fake drug factory destroyed by Sakri police dhule crime news)
साक्री पोलिस ठाण्यांतर्गत दहिवेल दूरक्षेत्राच्या परिसरात काही व्यक्ती मालट्रक व चारचाकी वाहनांमध्ये वापरण्यात येणारे ‘डीईएफ’ युरियाचे बनावट उत्पादन करीत असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक मोतीराम निकम यांना मिळाली होती.
या माहितीच्या अनुषंगाने स्वतः निकम यांनी उपनिरीक्षक गणेश कोळी व अन्य सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता टाटा कंपनीचे ‘डीईएफ’चे बनावट उत्पादन तयार करण्याचा कारखाना आढळून आला.
त्यात सात लाख ५० हजार रुपये किमतीचे टाटा ‘डीईएफ’ कंपनीचे बनावट रसायन, एक लाख ५० हजार रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या १५ टाक्या व इतर साहित्य असा एकूण नऊ लाख ५६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कारवाईनंतर निरीक्षक निकम यांनी संबंधित टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता कंपनीकडून सागर अशोक आबनावे (रा. पुणे) यांनी साक्री पोलिस ठाण्यात येत कंपनीतर्फे फिर्याद दिली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोतीराम निकम, उपनिरीक्षक गणेश कोळी, राजू जाधव, संजय शिरसाठ, उमेश चव्हाण, शांतिलाल पाटील, भूषण वाघ, दिनेश मावची, संतोष मोरे, निखिल काकडे, महेंद्र वानखेडे, अनिल पवार यांच्या पथकाने कारवाई केली. उपनिरीक्षक रोशन निकम तपास करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात बनावट व भेसळयुक्त रसायने, इंधन विक्री होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.