Dhule News : नवीन 626 कोटींचे प्रस्ताव शासनाकडे; विविध कामे प्रगतिपथावर

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : शहरात केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ६३५ कोटींची कामे सुरू आहेत, तर नव्याने ६२६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत, अशी माहिती महापौर प्रतिभा चौधरी यांनी आपल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या भाषणातून दिली. (demand proposals for development works worth 626 crore have been submitted to government by dhule municipal corporation news)

गेल्या चार- साडेचार वर्षांपासून सुरू असलेली बहुतांश कामे धुळेकरांना माहीत आहेत. ती कधी पूर्ण होतील याची प्रतीक्षा आहे. नव्याने प्रस्तावित कामांमध्ये प्रामुख्याने पांझरा नदी विकास प्रकल्प, शहरातील नाले सुशोभीकरण व रिटेनिंग वॉल बांधणे, फ्लायओव्हर, वेस्ट टू वंडर पार्क आदी कामांचा समावेश आहे.

महापालिकेचे २०२२-२३ चे सुधारित व २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक बुधवारी (ता. ९) महापालिकेच्या महासभेने मंजूर केले. तब्बल ९३९ कोटींवर हे अंदाजपत्रक आहे.

यात प्रामुख्याने केंद्र, राज्य शासनाने मंजूर केलेल्या विविध योजना, रस्तेकामांचा समावेश दिसतो. या केंद्र, राज्य शासनाकडून मंजूर विविध योजनांचा उल्लेख महापौर प्रतिभा चौधरी यांनी आपल्या अंदाजपत्रकाच्या भाषणात केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule Crime News : आनंदखेड्यात पोलिसांना धक्काबुक्की; पुतळा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा

तब्बल ६३५ कोटी रुपयांची कामे शहरात सध्या सुरू आहेत. प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी म्हटले. या योजना, कामांकडे नजर टाकल्यास बहुतांश व मोठ्या रकमेच्या योजना या केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांपासून याच योजनांचा गाजावाजा सुरू आहे.

६३५ कोटींची कामे अशी

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियान १.० अंतर्गत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना- १७० कोटी, अमृत अभियान १.० अंतर्गत मलनिस्सारण योजना (भुयारी गटार योजना)- १५६ कोटी, महाराष्ट्र राज्य नागरोत्थान (राज्यस्तरीय) योजनेंतर्गत एकूण २१८ कोटींची कामे, मूलभूत सेवा सुविधा योजनेंतर्गत एकूण १२ प्रस्तावांची ८९ कोटींची कामे, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत एकूण दोन प्रस्तावांची दोन कोटींची कामे याचा यात समावेश आहे.

ही कामे सद्यःस्थितीत शहरात सुरू असल्याचे महापौर श्रीमती चौधरी यांनी म्हटले आहे. याशिवाय ८९४ कोटींच्या विविध कामांना तत्त्वतः मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : जिल्ह्यात अभिव्यक्ती मताची स्पर्धा; कॉलेजियन विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

६२६ कोटींची कामे प्रस्तावित

धुळे शहरासाठी तब्बल ६२६ कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित असून, या कामांचे मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत, असेही महापौर श्रीमती चौधरी यांनी म्हटले आहे.

या कामांमध्ये धुळे शहरातील नाले सुशोभीकरण करण्याकरिता ग्याबियन रिटेनिंग वॉल बांधणे व सुशोभीकरण करणे (एकूण लांबी २५ किलोमीटर) १५० कोटी, हद्दवाढ क्षेत्रातील कामांसाठी १२६ कोटी, धुळे शहरातील रेल्वे रुळावर आग्रा रोड निसर्गोपचार केंद्राजवळ (मालेगाव रोड) व १०० फुटी रोड येथे फ्लायओव्हर करण्यासाठी २५ कोटी, पांझरा नदी विकास प्रकल्पासाठी १७५ कोटी, वेस्ट टू वंडर पार्कसाठी ५० कोटी व शहरातील रस्ते बळकटीकरणासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे पाहतो कामकाज; गावकारभाऱ्यांची मुदत संपूनही प्रशासकाची नियुक्तीच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.