Dhule News : रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास तसेच बंदी घातलेल्या प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांनी फेरीवाले, व्यापाऱ्यांना दिला.
उपायुक्त डॉ. नांदूरकर यांनी प्रभाग क्रमांक ८ मध्ये मुख्य बाजारपेठ, पाचकंदील परिसराला भेट देत फेरीवाले, व्यापारी यांना ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र दोन डस्टबिन ठेवण्याचे निर्देश दिले. (Deputy Commissioner warning Penalty for throwing garbage using carry bag dhule news)
तसेच आपल्या दुकानाबाहेर अथवा ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करता त्या ठिकाणी डस्टबिन ठेवले नाही, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास तसेच बंदी असलेल्या प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरल्यास संबंधितांविरुद्ध घनकचरा अधिनियम-२०१६ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान, फेरीवाले, व्यापाऱ्यांनी पाचकंदील परिसरातील कचराकुंडी महापालिकेने बंद केल्याने आम्ही सकाळी तसेच रात्री घंटागाडीमध्येच कचरा देतो, रस्त्यावर अथवा इतरत्र फेकत नाहीत, असे सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यानिमित्ताने उपायुक्त डॉ. नांदूरकर यांनी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातून निघणारा कचरा घंटागाडीतच टाकावा, तसेच ओला व सुका असे वर्गीकरण करून कचरा द्यावा, असे आवाहन केले.
या पाहणीप्रसंगी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, महेंद्र ठाकरे, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव, लिपिक विजय गोसावी, मुकादम अनिल जावडेकर, कैलास पाटील, घनकचरा संकलन सुपरवायझर नरेश वानखेडे, स्वयंभू ट्रान्स्पोर्टचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.