Nandurbar News : शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Shakambhari Devi
Shakambhari Deviesakal
Updated on

मंदाणे : येथील प्रसिद्ध कृषक दैवत शाकंभरी अष्टभुजा मातेचा यात्रोत्सव शुक्रवारपासून प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासह विविध प्रकारच्या नवसपूर्तीसाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. परिसरासह गुजरात, मध्य प्रदेशातील भाविक तब्बल पायी, तसेच वाजतगाजत कुलदैवतेला साकडे घालण्यासाठी येत आहेत.

यात्रेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, यूपी आदी राज्यांतून सर्वधर्मीय व्यावसायिक यात्रेत दाखल झाले आहेत. त्यांनीही आपल्याला व्यवसायाला हातभार लावणाऱ्या या जागृत देवीचे दर्शन घेतले व रात्रभर मोठ्या थंडीत जागून दुकाने थाटली. यात्रेत कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Devotees throng to see Shakambhari Devi Nandurbar News)

Shakambhari Devi
Dhule News : सुटीच्या दिवशी लाच घेणारा भूमिअभिलेख लिपिक जाळ्यात

समस्त कृषकांची व परिसरातील कुलदैवत असलेल्या श्री शाकंभरी अष्टभुजा मातेची महापूजा व महाआरती मंदाणे येथील प्रथम नागरिक सरपंच सुशीलाबाई पंडित पवार व पंडित पवार तसेच उपसरपंच शरद साळुंखे यांनी सपत्नीक केली. आरतीचा मान शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे यांना सपत्नीक मिळाला. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रेकरूंचे आकर्षण

यात्रेत मनोरंजनात्मक खेळ, जादूगार महाकाल, मौत का कुआ, विविध प्रकारचे राजस्थानी झुले, ब्रेक डान्स झुला, तमाशा मंडळ आदी आकर्षण ठरत आहे. कृषकांची दैवत असल्याने लाकडी, लोखंडी बैलगाड्या, विविध प्रकारची शेतीपयोगी अवजारे, प्लॅस्टिकचे ड्रम, भोईर आदींना यात्रेत पसंती दिली जात आहे. भांडे व्यापारी, मसाल्याचे व्यापारी, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले खेळणे, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीदेखील यात्रेत दुकाने मांडली आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Shakambhari Devi
Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही

स्वतंत्र आरोग्य बूथ

यात्रेत येणाऱ्या भाविक तसेच व्यावसायिकांच्या आरोग्याची समस्या उद्‍भवू नये म्हणून मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य बूथ उभरण्यात आले आहे. आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. मयूर सोनवणे, डॉ. शैलेंद्र पाटील व सर्व कर्मचारी सांभाळणार आहेत.

स्वतंत्र पोलिस चौकीची उभारणी

यात्रेत कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. शहादा पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असलोद दूरक्षेत्राचे हवालदार अशोक कोळी, पोलिस नाईक जितेंद्र ईशी यांच्यासह पोलिस कर्मचारी धुरा सांभाळत आहेत.

Shakambhari Devi
Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.