Dhandai Devi Yatrototsav : आदिमाया धनदाईदेवी मातेचा उद्यापासून यात्रोत्सव

Dhandai Devi Yatrototsav
Dhandai Devi Yatrototsavesakal
Updated on

दगाजी देवरे‌ : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी (जि. धुळे) : येथील ७७ पेक्षा अधिक कुळांचे कुलदैवत असलेल्या आदिमाया धनदाईदेवी मातेचा यात्रोत्सवास बुधवार (ता. २९)पासून आरंभ होत आहे. (Dhandai Devi Yatrototsav starting from 29 march dhule news)

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली असून, विविध व्यावसायिक दाखल झाले आहेत. देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने राज्यासह मध्य प्रदेश व गुजरातमधून नवसपूर्तीसह दर्शनासाठी हजेरी लावतात.

म्हसदी (ता. साक्री, जि. धुळे) येथे डोंगराच्या कुशीत धनदाई मातेचे शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती असल्याने वर्षभर या ठिकाणी लाखो भाविक मातेच्या चरणी नतमस्तक होतात. नवसाला पावणारी देवी म्हणून दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा वाढत आहे. मंदिराचा कारभार धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ पाहते.

मंडळाने गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या देणगीतून मंदिर परिसराचा कायापालट केला आहे. नवसपूर्ती व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. हा बदल भाविकांनी सढळपणे दिलेली देणगी, भाविकांची वाढती संख्या, मंदिर प्रशासनामुळे झाला आहे. गावापासून दीड किलोमीटरवर देवीचे मंदिर आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Dhandai Devi Yatrototsav
Dhule Market Committee Election : भाजप स्वबळावर लढणार

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ धार्मिक अधिष्ठानासह पर्यावरणाच्या संवर्धनाचे मोठे काम करीत आहे. १९७३ मध्ये गावातील १७ तरुणांनी एकत्र येत मंदिराचा जीर्णोद्धार केला. याच १७ तरुणांनी पुढे धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाची स्थापना केली. मंडळाने भाविकांना सुविधा देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

मंदिराजवळ चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, अष्टमीला पहाटे सामुदायिक काकड आरती केली जाते. चैत्रात अष्टमीपासून मोठा यात्रोत्सव असतो. या काळात‌‌ लाखो भाविक हजेरी लावतात. यंदा तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येईल.

अष्टमीच्या दिवशी (ता. २९) पहाटे साडेपाचला सरपंच शैलजा देवरे, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक काकड आरती होईल. दुपारी चारला तगतरावाची (लांगड) मिरवणूक काढण्यात येईल. रात्री दहाला करमणुकीसाठी क्रांतीभाऊ सोनवणे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल.

Dhandai Devi Yatrototsav
Dhule News : जि.प. पदाधिकारी, सदस्य लालपरीत; ‘महिला सन्मान’ योजनेच्या स्वागतासाठी बसमधून प्रवास

गुरुवारी (ता. ३०) अमरावती नदीपात्रात दिवसभर कुस्त्यांची दंगल होईल. रात्री दहाला पुन्हा करमणुकीसाठी भीमा-नामा यांचा तमाशाचा कार्यक्रम होईल. देवीच्या पालखी मिरवणुकीत विशेषत: गावातील सर्व तरुण, भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ केंद्र, सत्संग मंडळासह गावातील सर्व धार्मिक मंडळे सहभागी होतील.

यात्रा बदलांच्या वाटेवर

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने भाविकांना दिलेल्या विविध सुविधांमुळे दर वर्षी येणारी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. किंबहुना यात्रेत याचा मोठा बदल जाणवत आहे. पूर्वी बैलगाडी वा पायी येणारा भाविक स्वयंचलित वाहनांनी येऊ लागला आहे. धावपळीच्या युगात दोन दिवस मुक्कामी असणारे भाविक नवसपूर्तीनंतर अवघ्या काही तासांत माघारी फिरतात.

आठवडाभर चालणाऱ्या यात्रोत्सवात राज्यभरातील ७७ कुळांचे भाविक हजेरी लावतात. अष्टमीच्या पहिल्या दिवशी नवसपूर्तीसाठी लाखो भाविक हजेरी लावतात. व्यावसायिक दाखल होऊ लागले आहेत. गुळाची जिलबी व गोडीशेव यात्रेचे खास वैशिष्ट्य मानले जाते. फिरते पाळणे, रसवंती, संसारोपयोगी वस्तू, कटलरी विक्रेते दाखल झाले आहेत. यातून शेकडोंना रोजगार उपलब्ध होतो.

Dhandai Devi Yatrototsav
Dhule Market Committee Election : 18 जागांसाठी 'या' तारखेला मतदान

"धनदाईदेवीस कुलदैवत मानणारे भाविक राज्यभर आहेत. भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तरुण ऐक्य मंडळाचे प्रयत्न असतात." -सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ

"धनदाईदेवी नवसाला पावते म्हणून दर वर्षी गर्दी वाढतच आहे. देवीच्या यात्रोत्सवासाठी सर्व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य असते." -महेंद्र देवरे, सचिव, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ

मंडळाची कार्यकारिणी

अध्यक्ष- सुभाष देवरे, उपाध्यक्ष- काशीनाथ देवरे, खजिनदार- उत्तमराव देवरे, सचिव- महेंद्र देवरे, संचालक- यशवंतराव देवरे, गंगाराम देवरे, रघुनाथ देवरे, हिंमतराव देवरे, सुधाकर देवरे, निरंजन देवरे, सुनील देवरे, राकेश देवरे, सुरेश जैन, विनयकुमार देवरे, अनिल देवरे, नरेंद्र देवरे, डॉ. अमितकुमार चव्हाण आदी

Dhandai Devi Yatrototsav
NCP News : बाजार समित्यांसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू; बडे नेते येणार नाशिक दौऱ्यावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.