Dhule News : मायबाप सरकार शेतकऱ्यांना जगू द्या! धुळ्यात धरणे आंदोलन

कर्जमाफी करून भीक काय मागायला लावतात. शेतमालाला योग्य भाव द्या. सन्मानाने जगू द्या. मायबाप सरकार शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाहीये का, असा संताप सवाल शेतकऱ्यांनी केला.
Officials of Independent Bharat Party and Farmers Association during the dharna movement.
Officials of Independent Bharat Party and Farmers Association during the dharna movement.esakal
Updated on

कापडणे : शेतमाल निर्यात करण्याऐवजी बेसुमार आयाती सुरू आहेत. शेतमालाला भाव नाही. कर्जमाफी करून भीक काय मागायला लावतात. शेतमालाला योग्य भाव द्या.

सन्मानाने जगू द्या. मायबाप सरकार शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाहीये का, असा संताप सवाल शेतकऱ्यांनी केला. (Dharne protest in Dhule by farmers organization news)

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडत आक्रोश केला. जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी म्हणाले, की राज्यातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे.

एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत, तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदेबंदी, बेसुमार आयाती करून शेतमालाचे भाव पाडत आहे.

परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखी किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतीसाठी वीजपुरवठा, पीकविमा, वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, असे अनेक प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत.

माजी अध्यक्ष आत्माराम पाटील म्हणाले, की सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी.

Officials of Independent Bharat Party and Farmers Association during the dharna movement.
Dhule News : दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्याने ‘समाधान’

शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा.

दरम्यान, या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुवंशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. डी. देवरे, शशिकांत भदाणे, शांतिलाल पटेल, आत्माराम पाटील, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी, भगवान पाटील, निंबाजी जाधव.

शांताराम गांगुर्डे, साहेबराव कुवर, भटू अकलाडे, नारायण माळी, भास्कर काकुस्ते, पांडुरंग काळे, गुणवंतराव पवार, अजित गिरासे, किसन माळी आदी उपस्थित होते.

Officials of Independent Bharat Party and Farmers Association during the dharna movement.
Dhule News : मालमत्ता करप्रश्‍नी धुळेकरांना दिलासा : आमदार फारूक शाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.