Dengue Update : धुळे शहरात आत्तापर्यंत तापाचे 15 रुग्ण; जूनमधील स्थिती

Dengue Update : पावसाळा सुरू झाल्यानंतर आरोग्याचे प्रश्‍नही उफाळून येतात. विशेषतः किटकजन्य आजारांचे रुग्ण वाढतात.
A woman scoops up stagnant water from a mosquito breeding pond. In the second photo, the staff inspecting the coolers.
A woman scoops up stagnant water from a mosquito breeding pond. In the second photo, the staff inspecting the coolers.esakal
Updated on

Dengue Update : पावसाळा सुरू झाल्यानंतर आरोग्याचे प्रश्‍नही उफाळून येतात. विशेषतः किटकजन्य आजारांचे रुग्ण वाढतात. सद्यःस्थितीत जूनमध्ये तापाचे १५ रुग्ण आढळले आहेत. यातील एकही डेंगी, मलेरिया पॉझिटिव्ह नसल्याची माहिती महापालिका मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, किटकजन्य आजारांना प्रतिबंधासाठी नागरिकांनी आवश्‍यक दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. (15 cases of dengue in city status in June )

किटकजन्य आजारांत हत्तीरोग, हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिंका या सारख्या आजारांचा समावेश आहे. यांपैकी हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. तर एडिस इजिप्ती या डासामुळे डेंग्यूची लागण होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

१५ संशयित रुग्ण

दरम्यान, जूनमध्ये आत्तापर्यंत शहरात तापाचे १५ रुग्ण आढळले आहेत. तापाचे रुग्ण आढळल्यानंतर संबंधित खासगी दवाखान्यांसह महापालिका कर्मचाऱ्यांकडून संबंधित रुग्णांचे रक्त नमुने घेतले जातात. या १५ संशयित रुग्णांपैकी एकाही रुग्ण डेंग्यू, मलेरियाचा नसल्याचे महापालिका मलेरिया पर्यवेक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

महापालिकेमार्फत शहरात फवारणी, ॲबेटींग, कंटेनर सर्वेक्षण सुरू असल्याचेही जाधव म्हणाले. विविध शोभेची झाडे-झुडपे असलेल्या कुंड्यांमधील साचलेले पाणी, कुलरच्या भांड्यातील पाणी काढून टाकण्याच्या सूचनाही कर्मचारी नागरिकांना करत आहेत. (latest marathi news)

A woman scoops up stagnant water from a mosquito breeding pond. In the second photo, the staff inspecting the coolers.
Nashik Dengue Update: 8 दिवसांत डेंगीचे सव्वाशे रुग्ण

या करा उपाययोजना

किटकजन्य आजार होऊ नयेत, यासाठी या डासांची उत्पत्ती रोखण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी साचलेले पाणी वाहते करावे, पाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्डा वापरावा, घरातील सभोवतालच्या डास उत्पत्ती स्थळे नष्ट करावीत, परिसर स्वच्छ ठेवावा, साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा वंगणाचे थेंब टाकावे, पाण्याचे साठे झाकून ठेवावेत, घरातील साठविलेल्या पाण्यात चनचुन्या, चांडक, हेंडवे इ. अळ्या दिसून येताच पाण्याचे साठे धुऊन पुसून कोरडे करावे.

आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. तसेच शरीर झाकेल, असे कपडे परिधान करावेत, उघड्यावर झोपू नका, निरुपयोगी विहिरीत व साचलेल्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी मासे टाकावेत, सायंकाळच्या वेळेस घरातील दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, गोठ्यात पाला-पाचोळ्यांचा धूर करावा. मच्छरदाणीचा वापर करावा, पाण्याच्या टाक्या, रांजण, माठ, वॉटर कुलर रिकामे करून स्वच्छ पुसून घ्यावेत.

छतावरील टायर, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या कुंड्याखालची पेट्रोडीश, बादल्या, फ्रीजमधील ट्रे, निरुपयोगी माठ, भांड्यात पाणी साचू देवू नये. कुलर, फुलदाण्या, झाडांच्या कुंड्या, प्राण्यांचे पाणी पिण्याचे भांड्यातील पाणी बदलत राहावे. डेंग्यूसह किटकजन्य आजार होऊ नयेत यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे आयुक्‍त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील, आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख यांनी कळविले आहे.

A woman scoops up stagnant water from a mosquito breeding pond. In the second photo, the staff inspecting the coolers.
Nashik Dengue Update : जिल्ह्यात 99 रुग्णांना डेंगीची लागण; ग्रामीण भागातही प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.