धुळे : धुळे महापालिकेत काहीही होऊ शकते याचा नमुना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. २००९ मध्ये कार्यादेश झालेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी २०२४ मध्ये अर्थात तब्बल १५ वर्षांनंतर बुधवारी (ता. १४) ‘प्रशासकीय स्थायी’ समितीपुढे ठेवण्यात आला.
या विषयावर मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी अधिकाऱ्यांना काही प्रश्न करत याबाबत व्यवस्थित पडताळणी करून पुढील कार्यवाही करा, अशा सूचना दिल्या. तसेच शहरातील संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करणे, धुळे महापालिकेत ई-गव्हर्नन्सअंतर्गत ईआरपी सॉफ्टवेअर मॉड्यूल्स संगणकप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्राप्त निविदाही मंजूर करण्यात आली. (Dhule Municipal Corporation strange administration)