Dhule News : अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी जिल्ह्यास 17 कोटी; लाभार्थ्यांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान लाभ

Dhule : पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे.
Fund
Fund esakal
Updated on

Dhule News : पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे तरुण उद्योजक निर्माण होत आहेत. तसेच बंद उद्योगांना नवसंजीवनी मिळते आहे. याकामी केंद्र शासनाकडून जिल्ह्याला यंदा १७ कोटींचा निधी मिळाला आहे. योजनेसाठी आतापर्यंत ऑनलाइन ३३४ अर्ज दाखल झाले आहेत. योजनेत शेतीमालावर प्रक्रिया उद्योगास वैयक्तिक लाभार्थीसाठी अधिकाधिक दहा लाखांचे अनुदान दिले जात आहे. ( 17 crore funding to district for food processing industries )

जिल्ह्यात गूळ, काजू, फळे, भाजीपाला, कडधान्ये, तेलबिया यावर प्रक्रिया करणाऱ्‍या उद्योगांना अनुदान दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अट नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर जिल्हा संसाधन कर्मचारी त्यांना मदत करतात.

ऑनलाइन अर्जाची सोय

जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी योजनेंतर्गत २५० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. अंतर्गत धुळे जिल्ह्यासाठी १७ कोटी ७१ लाख दोन हजार ८६६ रुपयांची गुंतवणूक केली. आतापर्यंत १३ कोटी ६० लाख ९९ हजार ८६२ रुपयांचा निधी बँकेने मंजूर करून पैकी दहा कोटी ७४ लाख ६९ हजारांचा निधी वितरित केला आहे. (latest marathi news)

Fund
Dhule News : चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे..! आमदार रावल यांच्याकडून पेडकाई अन आशापुरी मातेला साकडे

लाभार्थ्यांना योजनेसाठी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाच्या (पीएमएफएमई) संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतो. या अर्जानंतर जिल्हा संसाधन अधिकारी संबंधित लाभार्थ्यांना मदत करतात. या योजनेसाठी वर्षभरात कधीही ऑनलाइन अर्ज करू शकता. योजनेच्या लाभासाठी बँकेला कर्ज देणे बंधनकारक आहे. मात्र, कर्जाचा विनियोग शेड उभारणे, यंत्रसामग्री खरेदी करणे, कच्चा माल खरेदी करण्यासाठी करता येतो.

कृषी विभागाचे नियोजन

जिल्हा २०२२- २०२३ मध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत अग्रस्थानी राहिला. मात्र, जिल्हा संसाधन व्यक्तींना वेळेत मानधन न मिळाल्याने जिल्हा मागे राहिला. यंदा चांगले काम करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यावर्षी शासनाकडून धुळे जिल्ह्याला २५० लाभार्थींचे उद्दिष्ट आले. मात्र, उद्दिष्टापेक्षा अर्ज अधिक आले. जिल्ह्यात सुमारे ३३४ पात्रताधारकांना योजनेचा लाभ दिला आहे.

Fund
Dhule News : शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा; गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने नवीन शैक्षणिक वर्षापासून अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.