धुळे : शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा व बहुप्रतीक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर सोमवारी (ता. २) केंद्रीय कॅबिनेट समितीने (सीसीईए) ३०९ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.
या रेल्वेमार्गासाठी दहा वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, निधी मंजूर केल्याबद्दल डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना आभारासाठी फोन केला असता रेल्वेमंत्र्यांनीच डॉ. भामरे यांचे अभिनंदन केले. (18 thousand 36 crores for Manmad Indore railway)