Dhule News : करवसुली ठेक्यातून सोनगीरला 2 लाख

Dhule : आठवडे व दैनंदिन बाजारातील कर वसुलीसह विविध ठेके लिलाव पद्धतीने देण्यात आले.
Officials and villagers present in the auction process.
Officials and villagers present in the auction process.esakal
Updated on

Dhule News : येथील आठवडे व दैनंदिन बाजारातील कर वसुलीसह विविध ठेके लिलाव पद्धतीने देण्यात आले. त्यातून ग्रामपंचायतीला सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी बोली लागल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. मार्च २०२५ पर्यंत नऊ महिन्यांसाठी विविध ठेके लिलाव पद्धतीने देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक झाली. अकरा इच्छुकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. ( 2 lakhs to Songir from tax collection contract )

दरवर्षी एप्रिलच्या सुरवातीला लिलाव होतो पण यंदा तीन महिने उशीर झाला. दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार, दैनंदिन बाजारात करवसुली तसेच पाझर तलावात मासेमारीसाठी बोली लागली. आठवडे बाजार कर वसुली ९८ हजार, दैनंदिन बाजार ७५ हजार, पाझर तलावात मासेमारी २५ हजार अशी अंतिम बोली लागली. (latest marathi news)

Officials and villagers present in the auction process.
Dhule News : कृषी विभागाच्या योजनांपासून बळीराजा‌ ‘वंचित’! रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांची फरपट

यावेळी सरपंच रंजना मोरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्यामलाल मोरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल कासार, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, इरफान कुरेशी, राजेंद्र जाधव, धाकू बडगुजर, आरिफ खॉं पठाण, पिंटू भिल, मोहन सैंदाणे, अल्ताफ कुरेशी, श्याम माळी, देविदास बडगुजर, भूषण मोरे आदी उपस्थित होते. गोपाल माळी, लोटन भोई, प्रवीण शिरसाठ, ज्ञानेश्वर धोबी, दीपक भोई, रामलाल महाजन, संजय भिल, गोपाल सोनवणे, महेंद्र भोई आदींनी लिलावात सहभाग घेतला.

Officials and villagers present in the auction process.
Dhule News : पूल अन् रस्त्यांची कामे फलकांविनाच सुरू! वाहनधारकांना त्रास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.