Dhule Dengue Update : जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात एकाच दिवसात 22 डेंगी संशयित रुग्ण! मनपातर्फे नियमित उपाययोजना

Latest Dengue News : जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयातून मनपा मलेरिया विभागाला प्राप्त अहवालानुसार बुधवारी (ता.१८) एकाच दिवशी २२ तापाचे रुग्ण आढळून आले.
The staff of Dhule Municipal Malaria Department while carrying out measures such as container survey, abatement, dusting etc. in various areas.
The staff of Dhule Municipal Malaria Department while carrying out measures such as container survey, abatement, dusting etc. in various areas.esakal
Updated on

Dhule Dengue Update : पाऊस, ऊन, रात्री थोडा गारठा अशा बदलत्या वातावरणामुळे शहरात सध्या ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीच्या समस्या घेऊन नागरिकांची दवाखान्यात गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयातून मनपा मलेरिया विभागाला प्राप्त अहवालानुसार बुधवारी (ता.१८) एकाच दिवशी २२ तापाचे रुग्ण आढळून आले. या रुग्णांना डेंगी संशयित म्हणून गृहीत धरून त्यादृष्टीने रक्तजल नमुने व इतर उपाययोजना मनपातर्फे सुरू आहेत. (22 suspected dengue patients in single day)

जून ते ऑक्टोबरदरम्यान डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दरवर्षी तापाचे रुग्ण या काळात वाढतात. विशेषतः डेंगीचा धोका पाहायला मिळतो. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेतर्फे उपाययोजना केल्या जातात. नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाते. ज्या भागातून डेंगी संशयित रुग्ण आढळून येतो.

त्या भागात संशयित रुग्णाच्या घराच्या परिसरातील २०० घरांचे सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात असल्याचे धुळे मनपा मलेरिया विभागाकडून सांगण्यात आले. सर्वेक्षणासह ॲबेटींग, धुरळणी, फवारणी आदी उपाययोजनांचा यात समावेश आहे. याशिवाय नागरिकांना डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबतही मार्गदर्शन केले जाते.

आत्तापर्यंत २१ पॉझिटिव्ह

यंदा जून ते १९ सप्टेंबरपर्यंत धुळे शहरात एकूण ५२८ डेंगी संशयित रुग्ण आढळून आले. यातील २१ रुग्णांचे अहवाल डेंगी पॉझिटिव्ह आले. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे उपाययोजनांनाही वेग देण्यात आला. संशयित व पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. (latest marathi news)

The staff of Dhule Municipal Malaria Department while carrying out measures such as container survey, abatement, dusting etc. in various areas.
Dengue Disease : डेंगीचा डंख लाखाला..! माहिती, उपाय, खबरदारी जाणून घ्या सर्वकाही

२२ संशयित रुग्ण

धुळे महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून शहरातील सरकारी दवाखान्यांसह खासगी दवाखाने, लॅब यांच्याकडून रोज डेंगी संशयित रुग्णांबाबत माहिती घेतली जाते. संबंधित रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन ते श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले जातात.

या प्रक्रियेत बुधवारी (ता.१८) जिल्हा रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार २२ तापाचे रुग्ण (डेंगी संशयित) आढळून आले. संबंधित संशयित रुग्णांच्या घर व परिसरात यंत्रणेकडून उपाययोजना सुरू आहेत.

संशयित रुग्ण म्हणजे काय?

सरकारी, खासगी दवाखान्यात आरोग्याच्या विविध समस्या घेऊन गेलेल्या रुग्णांपैकी ज्यांना ताप व इतर डेंगीसदृश्‍य लक्षणे असतात, अशा सर्व रुग्णांचे रक्तजल नमुने घेतले जातात. या सर्व रुग्णांना डेंगी संशयित रुग्ण म्हणून गृहीत धरले जाते.

अर्थात यातील बहुतांश रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनही असते. त्यामुळे जोपर्यंत शासकीय रुग्णालयातून संबंधितांचा तपासणी अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत ते डेंगी संशयित म्हणूनच गणले जातात. शासकीय अहवालात ‘पॉझिटीव्ह’ उल्लेख असेल तरच तो रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह गणला जातो.

The staff of Dhule Municipal Malaria Department while carrying out measures such as container survey, abatement, dusting etc. in various areas.
Dhule Riot News : दोंडाईचात सर्व व्यवहार ठप्प! दोन गटांत दगडफेक; पोलिसांकडून स्थिती नियंत्रणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.