Dhule News : ‘तापी’च्या जलवाहिनीसाठी 228 कोटींचा प्रस्ताव! मनपातर्फे संविधान सभागृह, दिव्यांग भवन, महिलांसाठी वसतिगृह

Latest Dhule News : शहरवासीयांना पाणीपुरवठ्यासाठी अक्कलपाडा योजना कार्यान्वित झाली असली तरी दरवर्षी होणारे पर्जन्यमान व पाण्याची उपलब्धता लक्षात घेता तापी पाणीपुरवठा योजना हा शाश्‍वत जलस्रोत आहे.
Commissioner Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative General Assembly on Thursday. Neighbor Officer.
Commissioner Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative General Assembly on Thursday. Neighbor Officer.esakal
Updated on

Dhule News : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजना (राज्यस्तरीय) महाअभियानांतर्गत सुमारे ७५ कोटींच्या खर्चाची ६७ कामे व या कामांचा मनपा हिस्सा अदा करणे, तसेच तापी पाणीपुरवठा योजनेवरील जलवाहिनीच्या नूतनीकरणाचा २२८ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करणे, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत शहरात संविधान सभागृह बांधणे, मनपा हद्दीत दिव्यांग भवन, महिलांसाठी वसतिगृह बांधणे, महापालिकेच्या दवाखान्यात श्‍वानदंश रुग्णांना एआरव्ही लस मोफत देण्यासह विविध विषय महापालिकेच्या प्रशासकीय महासभेने मंजूर केले. (228 crore proposal for Tapi river water channel)

महापालिकेची प्रशासकीय महासभा गुरुवारी (ता. २६) दुपारी महापालिकेच्या स्व. दिलीप पायगुडे सभागृहात झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त हेमंत निकम, शोभा बाविस्कर, साहाय्यक आयुक्त प्रांजली मुंडे यांच्यासह विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

महासभेची मान्यता

महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजना (राज्यस्तर) महाअभियानांतर्गत १ ते ६७ कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा विषय सभेपुढे होता. एकूण ७५ कोटींचा खर्च यासाठी प्रस्तावित आहे. यात शासनाचा ७० टक्के अर्थात ५२.५ कोटी रुपये, तर मनपाचा ३० टक्के अर्थात २२.५० कोटींचा हिस्सा आहे.

या कामांच्या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता घेण्यासाठी ०.२५ टक्के प्रमाणे १८ लाख ७५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. याप्रमाणे तयार झालेला हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास महासभेने मान्यता दिली.

२२८ कोटींचा प्रस्ताव

शहरवासीयांना पाणीपुरवठ्यासाठी अक्कलपाडा योजना कार्यान्वित झाली असली तरी दरवर्षी होणारे पर्जन्यमान व पाण्याची उपलब्धता लक्षात घेता तापी पाणीपुरवठा योजना हा शाश्‍वत जलस्रोत आहे. मात्र, या योजनेवरील सुकवद ते बाभळे, बाभळे ते धुळे व धुळे एमबीआर ते मालेगाव रोड दगडी टाकी ही जलवाहिनी ३५ वर्ष जुनी असल्याने कमकुवत झाली आहे.

त्यामुळे या जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा विषय महासभेपुढे आला. एकूण २२८ कोटींचा खर्च मागणीचा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास मंजुरी देण्यात आली. (latest marathi news)

Commissioner Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative General Assembly on Thursday. Neighbor Officer.
High Court : राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या सचिवांना उच्च न्यायालयाकडून नोटिस

संविधान सभागृह

प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत संविधान सभागृह बांधण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे व निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा विषय होता. याकामी २०२२- २०२३ च्या दरसुचीनुसार १४ कोटी ९४ लाख ४७ हजार ४७८ रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी महापालिकेने मनपा शाळा क्रमांक-१४ ची जागा निश्‍चित केली. तसा ठराव मंजूर करून प्रस्ताव शासनास पाठविण्यास महासभेने मंजुरी दिली.

त्याचप्रमाणे मनपा हद्दीत दिव्यांग भवन बांधणे, भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष साहाय्य योजना २०२४- २०२५ योजनेचा भाग-१० अंतर्गत नोकरदार/कार्यरत महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचे विषयही मंजूर करण्यात आले. देवपूरमधील महानुभाव श्रीकृष्ण मंदिर, श्री चक्रधर आश्रमास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणेकामी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी मिळाली.

संकुलासाठी मनपा निधी

मनपा शहर विकास आराखड्यातील मंजूर फायनल प्लॉट नंबर-१५३ येथे मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेंतर्गत व्यापारी संकुल उभारण्यास ३५ कोटी रुपये मंजूर आहेत. दरम्यान, या कामाचे अंदाजपत्रक ४४ कोटी ८७ लाख ८७ हजार ३५४ रुपये आहे. त्यामुळे उर्वरित ९ कोटी ८७ लाख ७७ हजार ३५४ रुपये मनपा निधीतून देण्यास तसेच कामाची मुदत चार महिनेऐवजी १८ महिने करण्यास महासभेने मंजुरी दिली.

श्‍वानदंश लस सर्वांना मोफत

मनपा दवाखान्यात शहरातील रहिवासी व श्‍वानदंश रुग्णांना एआरव्ही लस मोफत देण्याचा ठरावही महासभेने मंजूर केला. यापूर्वी दारिद्र रेषेखालील रुग्णांसाठी मोफत तर दारिद्र रेषेवरील रुग्णांना ५० रुपये शुल्क आकारले जात होते. आता केवळ केस पेपरचे दहा रुपये लागतील.

Commissioner Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative General Assembly on Thursday. Neighbor Officer.
Dhule News: ‘त्यांनी’ अक्कल शिकवू नये, थेट भिडावे! मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांचे आव्हान; दोन जणांना पदोन्नती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.