Dhule News : नदीकाठावरील 25 गावांनी राबवावा ‘चिमठाणे पॅटर्न’

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची ‘दाहकता’ वाढत आहे. याला निसर्ग जेवढा जबाबदार आहे तेवढा मनुष्यही जबाबदार आहे.
Burai riverbed in the outskirts of the village is being plowed with JCB machines.
Burai riverbed in the outskirts of the village is being plowed with JCB machines.esakla
Updated on

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची ‘दाहकता’ वाढत आहे. याला निसर्ग जेवढा जबाबदार आहे तेवढा मनुष्यही जबाबदार आहे. बुराई नदीकाठावरील गावातील तरुण पिढीने व ग्रामस्थांनी ‘चंग’ बांधला तर नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व अवैध वाळू वाहतूक शंभर टक्के बंद केले तर बुराई नदी पुन्हा ‘खळखळून’ पुनर्प्रवाहित होणार आहे. (Dhule 25 villages on banks of river should implement Chimthane pattern)

त्यासाठी हवेत नदीकाठावरील गावांनी निःस्वार्थी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चिमठाणेसह पिंप्री येथील ग्रामस्थांनी व तरुणांनी एक ‘छोटेखानी’ प्रयत्न सुरू केला आहे. या प्रयत्नांना भविष्यात किती फायदा होतो ते समजणार आहे. तरुण पिढीला पाण्याचे महत्त्व दिवसेंदिवस पटू लागल्याने चिमठाणे व पिंप्री येथील काही तरुण एकवटले.

आणि बुराई नदीच्या संवर्धनासाठी गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आरंभी नदीत जेसीबी मशिनने नांगरणीला सुरवात करीत गुढी उभारली आणि ग्रामस्थांनी व तरुणांनी जशी मदत करता येईल तशी मदत करीत खारीचा वाटा उचलला आणि नदीचे गेलेले अस्तित्व पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (latest marathi news)

Burai riverbed in the outskirts of the village is being plowed with JCB machines.
Dhule Water Scarcity : संभाव्य पाणीटंचाईच्या सामन्यासाठी मनपाकडून नियोजन; पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

चावडीवरील गप्पांपेक्षा नदीत श्रमदान करावे

लोकसभा निवडणुकीचे वारे नको तेवढे यंदाच्या निवडणुकीत वाहत आहेत. गावातील चावडी व पारावर ग्रामस्थ व तरुण चर्चा करतात, त्यापेक्षा नदीच्या संवर्धनासाठी हातभार लावला तर भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. शासन व राजकीय पदाधिकारी काही करणार नाहीत म्हणून नदीकाठावरील गावांतील ग्रामस्थांनी व तरुणांनी एकत्र येत बुराई नदीचे संवर्धन कसे करता येईल यासाठी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

..तर बुराई व वाडी-शेवाडी तुडुंब

बुराई नदीचा उगम पाचमोडी (ता. साक्री) येथून आहे. उगमस्थळी नदीचे पात्र अरुंद आहे. जसजशी नदी प्रवाहित होते तसतसे लहान-मोठे नाले नदीला जोडले जातात. फोफादे (ता. साक्री) गावाजवळ बुराई मध्य प्रकल्प व शेवाडे (ता. शिंदखेडा) गावाजवळ वाडी-शेवाडी मध्य प्रकल्प आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे बुराई मध्य प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पात मृतसाठा आहे. यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Burai riverbed in the outskirts of the village is being plowed with JCB machines.
Dhule Lok Sabha Election : मतदानास ओळखपत्राचे 12 पुरावे ग्राह्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.