Dhule News : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्यासाठी आवश्यक ‘आपत्कालीन शेल्टर टेन्ट’ अर्थात तात्पुरता निवारा शेडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गावंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. (Dhule 3 Emergency Shelter Tent)
या वेळी तहसीलदार (महसूल) पंकज पवार, मनपा उपायुक्त संगीता नांदूरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र एस. सोनावणे, एसडीआरएफ सहाय्यक समादेशक बाबा पारस्कर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज मोहड, अग्निशमन अधिकारी अतुल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेंद्र माळी, स्वयंसेवक प्रतिनिधी ॲड. निखिल ठाकरे, होमगार्ड विभागाचे अधिकारी मराठे व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाकडून प्राप्त तात्पुरते निवारा शेडचे अग्निशमन कार्यालय, धुळे येथे निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांच्या उपस्थितीत अग्निशमन कर्मचारी, एसडीआरएफ धुळे, होमगार्ड, स्थानिक संस्था प्रतिनिधी, महापालिका धुळे, नगर परिषद, पालिका शिरपूर, दोंडाईचा, साक्री येथील कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक यांना टेन्ट व फायर ब्लॅंकेट संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
आपत्ती काळात उपयुक्त
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर व देशात आणि राज्यात अनेक प्रकारच्या नवनवीन नैसर्गिक आपत्ती उद्भवत आहेत. आपत्तीप्रसंगी आपत्तीग्रस्तांचा तत्काळ शोध घेणे, त्यांना आपत्तीतून सुखरूप बाहेर काढणे, जखमी किंवा आजारी व्यक्तींना तत्काळ वैद्यकीय उपचार पुरविणे यासाठी तसेच बहुतेक वेळा आपत्तीग्रस्तांना तात्पुरते स्थलांतर करावे लागते. (latest marathi news)
अशा नागरिकांना तात्पुरता निवारा किंवा शोध व बचाव पथक तसेच वैद्यकीय पथकास मदतकार्य करताना तात्पुरता कॅम्प म्हणून कापडी टेन्टची उभारणी करावी लागते. त्यादृष्टीने जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीमध्ये तत्काळ असा निवारा उभारता यावा यासाठी धुळे जिल्ह्यास यापूर्वी दोन व आता नव्याने तीन असे एकूण पाच टेन्ट उपलब्ध झाले आहेत. हे टेन्ट वजनाने हलके आहेत. तसेच आठ ते दहा मिनिटांत ते उभारले जातात. शिवाय ते वॉटरप्रूफ व फायरप्रूफ आहेत.
शिरपूर, दोंडाईचा, साक्रीला टेन्ट
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार प्रशिक्षण झाल्यानंतर यातील एक टेन्ट शिरपूर, एक दोंडाईचा व साक्री येथे पालिका, नगरपंचायतीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती श्री. गावंडे यांनी या वेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.