धुळे : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकल्पनेतून देशभरात ‘आपदा मित्र’ योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातून तीनशे आपदा मित्रांची प्रशिक्षणासाठी निवड होणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक- युवतींनी गुगल लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गावंडे यांनी केले. (300 students Training under Disaster Management)