Dhule News : रस्ता काँक्रिटीकरणासाठी 424 कोटी; शिरपूर तालुक्याला लाभ

Dhule : शिरपूर तालुक्यातील काही रस्ता काँक्रिटीकरणासाठी शासनाने तब्बल ४२४ कोटींचा निधी मंजूर केला.
MLA Patel
MLA Pawara
MLA Patel MLA Pawaraesakal
Updated on

Dhule News : शिरपूर तालुक्यातील काही रस्ता काँक्रिटीकरणासाठी शासनाने तब्बल ४२४ कोटींचा निधी मंजूर केला. याकामी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांनी पाठपुरावा केला.

‘हॅम’अंतर्गत बोराडी ते गिधाडे रस्त्याच्या काँक्रिटीकरणसाठी २२२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. (Dhule 424 crore for road concreting Benefit to Shirpur Taluk)

यात ३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २२२ कोटींचा निधी खर्च होईल. राज्य शासनाच्या सहकार्याने हायब्रिड अॅन्युटी मॉडेल (हॅम) फेज-२ अंतर्गत बोराडी-वाडी-वाघाडी-जातोडे-बाळदे-गिधाडे (ता. शिरपूर) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणसाठी हा निधी मंजूर झाला असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरवात होणार आहे.

२०२ कोटींचा निधी

शिरपूर-आढे-थाळनेर-मांजरोद-घोडसगाव-होळनांथे-बभळाज या ३२.८० किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य शासनाने २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या कामाची निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी आमदार पटेल, आमदार पावरा यांनी पाठपुरावा केला होता. आशियायी विकास बँकेने या कामासाठी निधी दिला आहे. (latest marathi news)

MLA Patel
MLA Pawara
Dhule News : धुळे जिल्ह्यातील 5 जणांना शासनाकडून ‘कृषी पुरस्कार’

शिरपूर-आढे-थाळनेर-मांजरोद-घोडसगाव-होळनांथे-बभळाज रस्ता प्रजिमा १२ किलोमीटर २/९०० ते ३६/७०० या ३२.८० किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण निधीतून साकारले जाणार आहे. या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

रस्ता पूर्ण झाल्यानंतर शिरपूर, आढे, थाळनेर, मांजरोद, घोडसगाव, होळनांथे, बभळाज परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांना प्रवासी वाहतुकीसह शेतमालाची वाहतूक करणे सुलभ ठरणार आहे. परिसरातील रहिवाशांनी निधी प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

आमदार पटेल आणि आमदार पावरा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शिरपूर मतदारसंघाचा पूर्णतः कायापालट झाला असून, शिरपूर मतदारसंघात विविध विकासकामे पूर्ण झाली असून, काही प्रगतिपथावर आहेत. काही मंजुरीस्तरावर आहेत.

MLA Patel
MLA Pawara
Dhule News : बांधकाम कामगारांना तालुकानिहाय भांडीवाटप : आमदार कुणाल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.