Dhule News : कुसुंबा (ता. धुळे) येथील केशवस्मृती अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेतील ६० ते ७० विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. १९) जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. आश्रमशाळेतील १६ विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हील) अतिदक्षता विभागात, तर सहा विद्यार्थ्यांना हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देवगावकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी सांगितले. (Dhule 60 students poisoned in ashram school)
विषबाधित विद्यार्थी- विद्यार्थिनी १२ ते १७ वयोगटातील आहेत. हिरे मेडिकलला सहा, सिव्हीलला १७, तर कुसुंबा आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळेत ४० ते ४५ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी वैद्यकीय पथकाची नियुक्ती झाली आहे. अहोरात्र पथक वैद्यकीय सेवा देईल, असे डॉ. बोडके यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
टँकरने पाणीपुरवठा
आश्रमशाळेत पाचवी ते बारावीपर्यंतचे एकूण ७६२ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. शुद्ध पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय आश्रमशाळेत नसल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी तक्रार आहे. महिन्यापासून आश्रमशाळेत टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी (ता. १८) दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले. विद्यार्थ्यांना शुक्रवारी अधिकच त्रास जाणवू लागल्यामुळे आश्रमशाळेतील कर्मचारी व शिक्षकांची तारांबळ उडाली. त्यामुळे २३ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पैकी सहा विद्यार्थ्यांना हिरे मेडिकलच्या रुग्णालय दाखल केले. (latest marathi news)
तपासणीसाठी नमुने
पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत नियमित तपासणी केली जाते का? पाणी तपासणी प्रक्रियेची साधने आहेत का? पाणी पिण्या योग्य आहे की नाही, याबाबतची शुद्धता तपासली जाते का? याविषयी आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षिकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगावकर यांनी विचारणा केली असता संबंधित समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. अन्न- औषध प्रशासनाच्या पथकाने जेवण, तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत, असे डॉ. बोडके यांनी सांगितले.
विषबाधित विद्यार्थी असे
शिल्पा रमेश वळवी, ममता सुनील राऊत, पूजा जोमा पावरा, नेहा शेमट्या वळवी, अंकुश धर्मा वळवी, कल्पेश लकी पाडवी आरती ज्ञानेश्वर पावरा, लक्ष्मी सोना वळवी, रंजिता रमेश नाईक, शालिनी सायसिंग वळवी, सुहासिनी काकड्या तडवी, प्रतिज्ञा सुरुपसिंग वळवी, पूनम सायसिंग वळवी, पिंटी मान्या वळवी, शर्मिला भिमसिंग वळवी, राकेश मोयला वळवी, रोशन पावरा, हर्शल लक्ष्मण गायकवाड, अनिल भाईदास वसावे, शगून धीरसिंग वळवी, अक्षर किशोर तडवी आदींचा विषबाधितांमध्ये समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.