Dhule Onion News : किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो 70 रुपये! कांद्याची लागवड चार-पाच टक्के; शेतकऱ्यांकडे कांद्याची वानवा

Latest Onion News : ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासही धजावत नसल्याची परिस्थिती आहे. कापडणे कांदा उत्पादकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र येथील शेतकऱ्यां‍कडे कांदा शिल्लक नाही. हीच स्थिती खेडोपाडी आहे.
Onion plant getting ready for onion planting
Onion plant getting ready for onion plantingesakal
Updated on

कापडणे : राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल चार हजार पाचशेच्या पुढे आहेत. तर किरकोळ बाजारात कांद्याची प्रतिकिलो सत्तरने विक्री होत आहे. कांद्याने आसवे आणली आहेत. ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासही धजावत नसल्याची परिस्थिती आहे. कापडणे कांदा उत्पादकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र येथील शेतकऱ्यां‍कडे कांदा शिल्लक नाही. हीच स्थिती खेडोपाडी आहे. (70 rupees per kg onion in retail market)

धुळे व लासलगावच्या बाजारात लाल कांद्याचा दर साडेचारपेक्षा अधिकने पोहचला आहे. धुळे बाजारात कांद्याची आवक बोटावर मोजण्याएवढ्या गोण्या येत आहेत. शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नाही. गेल्या वर्षाच्या दुष्काळामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत आटले होते. कांद्याची लागवड चार-पाच टक्केच झाली होती. परिणामी शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदाच नाही.

कापडणे हे कांद्याचे आगार आहे. येथील प्रत्येक बागायतदार शेतकरी कांद्याची लागवड करीत असतोच. प्रत्येक हंगामात कांद्यात नुकसान झाले तरी लागवड थांबवत नाही. सध्या गगनाला भिडणारे भाव आहेत. पण कांदा घरात नाही. (latest marathi news)

Onion plant getting ready for onion planting
Nashik Onion News : मालेगाव तालुक्यात 15 टक्के कांदा लागवड वाढणार; तालुक्यात 22 हजार हेक्टरवर कांदा लागवड

कांद्याचे रोप महागले

बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने कांद्याचे रोपही महागले आहे. साधारणतः अर्धा एकर रोपाची मागणी पाऊण लाखापेक्षा अधिक आहे. तरीही रोप मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कांद्याच्या भाववाढीमुळे गृहिणींनी कांद्याचा वापर मर्यादित केला आहे.

कांद्याची लागवड लांबलीच

धुळे जिल्ह्यात श्रावणात कांद्याची लागवड सततच्या पावसाने झालेली नाही. भाद्रपदात लागवड लांबली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही नवा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत नाही. कांद्याचे भाव वाढतच राहणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे.

Onion plant getting ready for onion planting
Onion News: विधानसभेतही गाजणार कांद्याचा मुद्दा? ही कारण आहेत महत्वाची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.