Dhule News : 8 लाखांवर रोपे सवलतीच्या दरात! जिल्ह्यात वाटप सुरू; ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ योजनेतंर्गत नागरिकांना लाभ

Dhule News : जिल्ह्यात ठिकठिकाणी ही प्रक्रिया राबविली जात आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन येथील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गजानन सानप यांनी केले.
Neenu Somraj while distributing trees in Van Bhavan. Neighbors Nitin Kumar Singh, Gajanan Sanap and staff.
Neenu Somraj while distributing trees in Van Bhavan. Neighbors Nitin Kumar Singh, Gajanan Sanap and staff.esakal
Updated on

Dhule News : केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या योजनेच्या पूर्ततेसाठी वन विभागाकडून ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वन महोत्सव कालावधीत सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमींना माफक दरात धुळे शहरातील वन भवनातील वन महोत्सव केंद्रात सवलतीच्या दरात आठ लाखांवर रोपे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी ही प्रक्रिया राबविली जात आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन येथील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गजानन सानप यांनी केले. (Dhule 8 lakh plants at discount price Distribution started in district)

जिल्ह्यात यंदा १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यात उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागातर्फे धुळे शहरातील वन भवनातील वन महोत्सव केंद्रात प्रादेशिक वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांच्या हस्ते नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्राचे उद्‌घाटन झाले.

आठ लाखांवर रोपे उपलब्ध

सामाजिक वनीकरण विभागाच्या धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील रोपवाटीकांमध्ये एकूण ८ लाख ५० हजार रोपे उपलब्ध आहेत. पैकी शासकीय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालयांना वन महोत्सव कालावधीत उपलब्धतेनुसार मोफत रोपे पुरवठा केला जात आहे.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यंदा ५० लाख वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिका, पोलिस विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्रे रोपे लागवडीसाठी सज्ज आहेत.

मोहिमतंर्गत महापालिकेला दीड लाख रोपांचा पुरवठा करण्यात आला. तसेच प्रती ग्रामपंचायत एक हजार रोपे वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे मोफत रोपे वाटप सुरु आहे. इतर यंत्रणा, शाळा, महाविद्यालय, पोलिस, संरक्षण बल यांना उपलब्धतेनुसार मोफत रोपे पुरवठा करण्यात येत आहे. सर्व यंत्रणा, संस्थांनी किमान तीन वर्षे रोपांचे संवर्धन करावे या अटीवर मोफत वृक्ष वाटप रोपवाटीकानिहाय सुरु केल्याचे श्री. सानप यांनी सांगितले. (latest marathi news)

Neenu Somraj while distributing trees in Van Bhavan. Neighbors Nitin Kumar Singh, Gajanan Sanap and staff.
Dhule News : दक्षता बाळगत वीज अपघात टाळावे! महावितरणचे आवाहन; धुळे, नंदुरबारसाठी संपर्क क्रमांक जाहीर

नऊ विक्री केंद्रे

सामाजिक वनीकरण विभागामार्फत नऊ वन महोत्सव रोपे विक्री केंद्रे कार्यारत आहेत. यात धुळे तालुक्यात वनभवन, राममनोहर लोहिया मार्ग, लेनिन चौक, धुळे येथे समन्वयक रोहयो वनपाल विजय नेरकर (मो. ९७६४२४७८१३), दोंडाईचा रोडवरील सोनगीर रोपवाटीका येथे समन्वयक वनरक्षक पी. एस. पाटील (९७६६६३४१२०), साक्री तालुक्यात साक्री तहसील कार्यालयासमोर समन्वयक वनपाल श्रीमती. एस. पी. साळुंखे (९४०३७१४५५५), पिंपळनेर बस स्थानकसमोर समन्वयक वनपाल के. व्ही. लांडगे (९४२३९४३२८५), शिंदखेडा तालुक्यात शेवाडेत मध्यवर्ती रोपवाटीका येथे समन्वयक वनपाल एम. सी. सोनार (९४२०१७७८६०), धुळे रोडवरील पाटण चौफुलीवर समन्वयक वनपाल पी. पी. गवारे (९६८९१ ४५७६८), दोंडाईचा येथे जयलक्ष्मी सुपर मार्केटजवळ समन्वयक वनरक्षक डी. डी. पाटील (९०२१९३९२०५), शिरपूर शहर पोलिस ठाण्याजवळ समन्वयक वनरक्षक एच. बी. वानखेडे (८९७५८७४२५१), दहिवद येथील राष्ट्रीय महामार्ग तीनलगत मध्यवर्ती रोपवाटीकेत समन्वयक वनरक्षक एम. के. गुजर (९९२३५४६९९९) यांच्याशी संपर्क साधा.

Neenu Somraj while distributing trees in Van Bhavan. Neighbors Nitin Kumar Singh, Gajanan Sanap and staff.
Nashik Monsoon Update : खरीप पिकांना जीवदान, मात्र टंचाई जैसे थे! 5 तासांतील 51 मिमी पावसाने येवलेकरांना दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.