सोनगीर : जिल्ह्यात सर्व जल प्रकल्पांमध्ये आठ वर्षानंतर सर्वाधिक म्हणजे ८१.३१ टक्के जल संचय झाला आहे. मध्यम प्रकल्पात ८०. ८६ टक्के तर लघुप्रकल्पात ८२.६४ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील प्रकल्पात ७५ टक्के साठाही झाला नव्हता. यंदा वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने जिल्हा पाणीटंचाई मुक्त राहील अशी स्थिती आहे. (81 percent water storage in project)