शिरपूर : धुळे- पळासनेर या ८८ किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणासाठी ८३५ कोटी रुपयांचा खर्च झाला. नंतर बीओटी तत्त्वावर टोलवसुली सुरू झाली. त्यात आतापर्यंत तब्बल दोन हजार कोटी रुपये वसूल झाले आहेत. परंतु, टोलवसुली थांबण्याचे नाव नाही.
भरीस भर म्हणून खड्डेयुक्त महामार्गाची डागडुजी करण्यासारख्या कामांकडेही संबंधित कंत्राटदार टाळाटाळ करीत आहे, अशी गंभीर तक्रार शिरपूर फर्स्ट संघटनेने प्रशासनासह शासनाकडे केली आहे. (835 crores spent on highway two thousand crores recovered by toll)