Dhule Monsoon Update : लामकानीत 85 मिलिमीटर पाऊस! घरांची पडझड, शेतशिवाराचे नुकसान

Dhule News : लामकानीत मंगळवारी (ता. १६) रात्री दीड तासात ८५ मिलिमीटर मुसळधार पाऊस झाला. दोन घरांची पडझड, पिकांसह शेतशिवाराचे नुकसान झाले.
Water flowing from the drain near the Jagannath Baba temple on the Lamkani to Dhule road and vehicles and passengers standing on the side of the road.
Water flowing from the drain near the Jagannath Baba temple on the Lamkani to Dhule road and vehicles and passengers standing on the side of the road.esakal
Updated on

Dhule News : लामकानीत मंगळवारी (ता. १६) रात्री दीड तासात ८५ मिलिमीटर मुसळधार पाऊस झाला. दोन घरांची पडझड, पिकांसह शेतशिवाराचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे तलाठी उमेश चव्हाण व कोतवाल नरेश माळी करीत आहेत. मंगळवारी साडेसातला लामकानीसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. (85 millimeters of rain in Lamkan)

जवळपास दीड तासापेक्षा जास्त वेळ पडणाऱ्या पावसामुळे वरच्या गावातील राहुल रतिलाल महाले व मुक्ताईनगरमधील नितीन मधुकर कोळी यांच्या घरांची पडझड झाली. यात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून, जीवितहानी नाही. लामकानीसह चिंचवार, नवलाणे, कोठारे, रामी या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले.

लामकानीत दीड तासात ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधारेने अनेक शेतशिवारात पिकांचे नुकसान झाले असून, शेतबांध पाण्याच्या प्रवाहात फुटून निघाल्याने शेतीचे नुकसान झाले. मुसळधारेमुळे नदी, नाले वाहून निघाले. (latest marathi news)

Water flowing from the drain near the Jagannath Baba temple on the Lamkani to Dhule road and vehicles and passengers standing on the side of the road.
Dhule MSRTC News : खिळखिळ्या ‘एसटी’तून जीवघेणा प्रवास! साक्री आगारातील आजारी बस धावताहेत रस्त्यावर

गेल्या वर्षी पाऊसच नसल्याने पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही मोठा दुष्काळ होता. या वर्षी पाऊस उशिरा आला. मुसळधार पाऊस शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावणारा होता, मात्र जास्तच पावसाने झालेल्या नुकसानीने चिंता वाढली आहे.

"या वर्षी उशिराने सुरू झालेला पावसाळा समाधानकारक असून, कालचा लामकानी परिसरात झालेला पाऊस अतिमुसळधार होता. यात पिकांसह शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले असून, गावात घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत." - तुषार महाले, पंचायत समिती सदस्य

Water flowing from the drain near the Jagannath Baba temple on the Lamkani to Dhule road and vehicles and passengers standing on the side of the road.
Dhule News : माजी नगराध्यक्ष पवारचा जामीनाबाबत अर्ज नामंजूर! पाटील पितापुत्र खून प्रकरणी खंडपीठात कामकाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.