Crop Insurance : शेतकऱ्यांचा पीकविम्याचा हिस्सा शासन भरत असल्याने आता एक रुपयात पीकविमा काढला जात आहे. खरिपातील पिकांना विम्याचे कवच घेण्याकडे यंदा धुळे जिल्ह्यात शेतकरी बऱ्यापैकी सरसावले असून, चक्क ९०९ टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. तथापि, उर्वरित शेतकऱ्यांनी पीक विमा न काढण्याची अनेक कारणे असल्याचे समोर आली आहेत. त्यात आधार कार्ड, बँक खाते अपडेट नसणे, मयत खातेदार, स्थलांतरित खातेदार व इतर तत्सम कारणांमुळे दहा टक्के शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. (90 percent of producers registered of crop insurance in district )