Dhule Accident News : अक्कलकुव्याजवळ अपघातात बोराडीचे 2 भाविक ठार; 17 जखमी

Accident News : देवमोगरा (जि. नंदुरबार) येथे देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचे अ‍ॅक्सल तुटल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर सुमारे १७ भाविक जखमी झाले.
MLA Kashiram Pavara, MLA Rajesh Padvi while questioning the injured in Nandurbar District Hospital.
MLA Kashiram Pavara, MLA Rajesh Padvi while questioning the injured in Nandurbar District Hospital.esakal
Updated on

शिरपूर : देवमोगरा (जि. नंदुरबार) येथे देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचे अ‍ॅक्सल तुटल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर सुमारे १७ भाविक जखमी झाले. हा अपघात १६ मार्चला सायंकाळी अक्कलकुवा रस्त्यावर खापर ते उदापूर गावादरम्यान घडला. मृत व जखमी बोराडी (ता. शिरपूर) येथील रामनगरचे रहिवासी आहेत. जखमींवर नंदुरबार व अक्कलकुवा येथे उपचार सुरू असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. (Dhule Accident near Akkalkuwa 17 injured marathi news)

बोराडीच्या रामनगर भागातील भाविक देवमोगरा देवीच्या दर्शनासाठी १५ मार्चला गेले होते. १६ मार्चला ते परत येण्यासाठी निघाले असताना पिक-अपचा अ‍ॅक्सल तुटला. त्यामुळे नियंत्रण सुटून पिक-अप पुलाखाली पडल्याने उलटली. अपघातात चंद्रसिंह रामदास पावरा (वय ३९) व दारासिंह बुधा पावरा (५६) जागीच ठार झाले.

जखमींमध्ये हिरालाल आजऱ्या पावरा, सुनील हुसन्या पावरा, दादू पावरा, गायत्री राजू पावरा, उषा पावरा, कालूसिंह जामसिंह पावरा, संजय बडे, बायनू पावरा, दीपक रणसिंह पावरा, रामबाई रामसिंह पावरा, देवा दला पावरा, भरत देवा पावरा, भारती राजू पावरा, बल्या लालसिंह पावरा, कुणाल मुकेश पावरा, रूपाली तुषार पावरा यांचा समावेश आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्यासह परिसरातील वाहनचालक आणि भाविकांनी मदतकार्य करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. (latest marathi news)

MLA Kashiram Pavara, MLA Rajesh Padvi while questioning the injured in Nandurbar District Hospital.
Jalgaon Fire Accident : तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला! शिरसोलीत दादरीच्या कणसांसह चारा खाक

अपघाताची माहिती मिळाताच बोराडी परिसरातील मंजित पवार, भरत पावरा, सुनील पावरा, रावसाहेब पावरा, कावा पावरा, मंगलसिंह पावरा, भरत पावरा, श्याम पावरा, बन्सीलाल पावरा आदींसह मृत व जखमींचे नातलग नंदुरबारकडे रवाना झाले. रविवारी (ता. १७) दिवसभर रामनगर परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली. मृतांवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार काशीराम पावरा यांनी रविवारी नंदुरबार येथे जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत शहाद्याचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, रमण पावरा, कैलास पावरा आदी उपस्थित होते.

MLA Kashiram Pavara, MLA Rajesh Padvi while questioning the injured in Nandurbar District Hospital.
Kolhapur Accident News: हृदय पिळवटून टाकणारी घटना! भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; 4 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.